स्पोर्ट: शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळेची बहारदार खेळी विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धा नागपूरच्या खेळाडूंनी गाजविला दुसरा दिवस
By Admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:26+5:302014-08-29T23:33:26+5:30
अकोला: विदर्भ कॅरम संघटनेच्यावतीने विदर्भ कॅरम अकादमी सभागृहात सुरू असलेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेतील तिसर्या फेरीतील लढतींमध्ये शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळे यांचा बहारदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस नागपूरच्या कॅरमपटूंनी गाजविला.

स्पोर्ट: शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळेची बहारदार खेळी विदर्भस्तरीय कॅरम स्पर्धा नागपूरच्या खेळाडूंनी गाजविला दुसरा दिवस
अ ोला: विदर्भ कॅरम संघटनेच्यावतीने विदर्भ कॅरम अकादमी सभागृहात सुरू असलेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेतील तिसर्या फेरीतील लढतींमध्ये शेख नदीम, दुर्गेश पांडे, यश काळे यांचा बहारदार खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस नागपूरच्या कॅरमपटूंनी गाजविला.शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी १८ वर्षाआतील मुलांच्या गटातील तिसर्या फेरीला सुरुवात झाली. यामध्ये शेख नदीम व ज्ञानेश्वर यांच्यात झालेली लढत नदीमने २०-०० ने जिंकली. दुर्गेश पांडे व यश काळे यांच्यात झालेल्या लढतीत दुर्गेशने यशवर २५-०० अशी मात केली. यश काळे व कृष्णा यांच्यातील लढतीत यशने परत एकदा निर्विवाद वर्चस्व राखले. कृष्णाला त्याने १४-०० ने पराभूत केले. मुलींच्या गटातील लढतींनाही प्रारंभ झाला. आंतरराष्ट्रीय पंच जे.व्ही. संगम यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा सुरू आहेत. (क्रीडा प्रतिनिधी) फोटोकॅप्शन: विदर्भ राज्य स्तर कॅरम स्पर्धेतील मुलींच्या गटात सुरू असलेल्या लढतीतील क्षण. -३०सीटीसीएल९१...