स्पोर्ट पेज: माऊंट कारमेल विजेता जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा

By Admin | Updated: September 12, 2014 22:38 IST2014-09-12T22:38:52+5:302014-09-12T22:38:52+5:30

अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत होलीक्रॉस कॉन्व्हेंटचा पराभव करीत माऊंट कारमेल इंग्लिश स्कूलने १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकाविले. बुलडाणा येथे सप्टेंबरअखेर होणार्‍या अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत माऊंट कारमेल संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Sport page: Mount Carmel winners District Level School Cricket Tournament | स्पोर्ट पेज: माऊंट कारमेल विजेता जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा

स्पोर्ट पेज: माऊंट कारमेल विजेता जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा

ोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित महानगरपालिका क्षेत्र जिल्हा स्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत होलीक्रॉस कॉन्व्हेंटचा पराभव करीत माऊंट कारमेल इंग्लिश स्कूलने १४ वर्षाआतील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकाविले. बुलडाणा येथे सप्टेंबरअखेर होणार्‍या अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत माऊंट कारमेल संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शुक्रवारी सकाळी माऊंट कारमेल स्कूल व होलीक्रॉस कॉन्व्हेंट संघात अंतिम सामना झाला. होलीक्रॉसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. निर्धारित ५ षटकात ७ बाद २४ धावा काढल्या. मयंक खत्री याच्या ८ धावा वगळता अन्य एकही फलंदाज यापेक्षा अधिक धावा काढू शकला नाही. प्रत्युत्तरात कारमेल संघाने विजयाचे लक्ष्य केवळ २ षटकातच पूर्ण केले. कारमेलने एकही गडी न गमविता सहज विजय मिळविला. यात कारमेलचा सलामीचा फलंदाज आकाश राऊत व सिद्धार्थ पाटील यांच्या अनुक्रमे २ व १६ धावांचा समावेश आहे. संकेत डिक्कर, अजलान राजा, मंदार अलोणे, विराज बिलाला, यशराज चुंगडे, अभिरथ अनासने, मित पोपट, करण सेठी, शिवम जोशी, आशय कदम, अमोघ काणे, अखिल जैन, प्रथम पोपट यांनीदेखील सामन्यात उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले. सिद्धार्थ पाटील सामनावीर ठरला. सामन्यात पंच म्हणून बंटी क्षीरसागर, अभिजित कर्णे यांनी काम पाहिले. स्पर्धेत २० शाळा संघांचा समावेश होता. विजेता संघाला प्राचार्य फादर जार्ज, माजी रणजीपटू नंदू गोरे, क्रीडा शिक्षक भूषण साळवे, प्रदीप अलकरी, मो. राजिक यांचे मार्गदर्शन लाभले. (क्रीडा प्रतिनिधी)
बॉक्स
१७ वर्षाआतील सामन्यांना सुरुवात
शुक्रवारी जिल्हा स्तर शालेय क्रिकेट स्पर्धेतील १७ वर्षाआतील गट मनपा क्षेत्रातील सामन्यांना सुरुवात झाली. स्कूल ऑफ स्कॉलर हिंगणा रोड, माऊंट कारमेल, नोएल स्टेट बोर्ड, जी.एस.कॉन्व्हेंट, गुरुनानक कॉन्व्हेंट संघाने प्राथमिक फेरीत विजय मिळविला.
फोटोकॅप्शन: विजेता माऊंट कारमेल संघ.
-१३सीटीसीएल३८
...

Web Title: Sport page: Mount Carmel winners District Level School Cricket Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.