स्पोर्ट: आंतरविद्यापीठ स्पर्धेत मनोज मारोडेला कांस्यपदक
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:30:33+5:302014-12-02T23:30:33+5:30
अकोला : राजभवन (मुंबई) निर्देशित आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकताच पार पडला. यामध्ये उंच उडी या क्रीडाप्रकारात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत अकोला येथील मनोज मारोडे कांस्यपदक पटकावले. त्याने १.७१ एवढे अंतर नोंदवले.

स्पोर्ट: आंतरविद्यापीठ स्पर्धेत मनोज मारोडेला कांस्यपदक
अ ोला : राजभवन (मुंबई) निर्देशित आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नुकताच पार पडला. यामध्ये उंच उडी या क्रीडाप्रकारात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत अकोला येथील मनोज मारोडे कांस्यपदक पटकावले. त्याने १.७१ एवढे अंतर नोंदवले. स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथील विद्यापीठ संघांचा समावेश होता. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. जी. दाणी, अधिष्ठाता डॉ. व्ही. एम. भाले, क्रीडा संचालक प्रा. संजय कोकाटे, संचालक डॉ. पी. जी. इंगोले, डॉ. डी. एम. मानकर, कुलसचिव ज्ञानेश्वर भारती तसेच सहयोगी अधिष्ठाता, शास्त्रज्ञ, विभागप्रमुख यांनी मनोजचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)फोटो : मनोज मारोडे याचे कौतुक करताना कुलगुरू डॉ. दाणी, क्रीडा संचालक प्रा. संजय कोकाटे. ०३सीटीसीएल२२...