स्पोर्ट: जिल्हास्तर बॉक्सिंग स्पर्धेत बीकेव्ही विजयी
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:05+5:302014-12-02T00:36:05+5:30
अकोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे झालेल्या सोळाव्या अकोला जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या (बीकेव्ही) संघाने सर्वाधिक पदकांची कमाई करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत कब-क्लास, सब-ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर गटात १५० हून अधिक बॉक्सर सहभागी झाले होते. स्नेहांकित आठवले, नीरज ठाकूर, शिवाजी गेडाम, गोपाल राठोड यांना बेस्ट बॉक्सरचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. स्नेहांकित, नीरज, हरिवंश टावरी, रोहन पटेकर, गोपाल, दीपक यादव, शिवाजी, योगेश येळणे, अभिजित लांडे, तुषार खुपसे, स्वराज भांबूरकर, अदनान खान, राज तायडे, राजेश्वर हरणे, सौरभ देशमुख, तुषार उपर्वट, अनिकेत ठोकळ, विशाल तुपे, ऋत्विक जगदाळे, समीर गौरवे, अंश पटेकर, वैभव जरवाल, शेख इजराईल, हृषीकेश आदींनी स्पर्धेत पदक मिळविले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा क्र

स्पोर्ट: जिल्हास्तर बॉक्सिंग स्पर्धेत बीकेव्ही विजयी
अ ोला : वसंत देसाई क्रीडांगण येथे झालेल्या सोळाव्या अकोला जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाच्या (बीकेव्ही) संघाने सर्वाधिक पदकांची कमाई करीत विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत कब-क्लास, सब-ज्युनिअर, ज्युनिअर, सिनिअर गटात १५० हून अधिक बॉक्सर सहभागी झाले होते. स्नेहांकित आठवले, नीरज ठाकूर, शिवाजी गेडाम, गोपाल राठोड यांना बेस्ट बॉक्सरचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला. स्नेहांकित, नीरज, हरिवंश टावरी, रोहन पटेकर, गोपाल, दीपक यादव, शिवाजी, योगेश येळणे, अभिजित लांडे, तुषार खुपसे, स्वराज भांबूरकर, अदनान खान, राज तायडे, राजेश्वर हरणे, सौरभ देशमुख, तुषार उपर्वट, अनिकेत ठोकळ, विशाल तुपे, ऋत्विक जगदाळे, समीर गौरवे, अंश पटेकर, वैभव जरवाल, शेख इजराईल, हृषीकेश आदींनी स्पर्धेत पदक मिळविले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ, प्रा. डॉ. मोहन खडसे, मुन्ना ठाकूर, आशीष वानखडे, अश्विन नवले, विजय गोटे, समाधान वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पदक प्रदान करण्यात आले.फोटो: स्पर्धेतील पदक विजेते मान्यवरांसोबत-२९सीटीसीएल१८...