स्पोर्ट: ड्युल सद्भावना चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याचा दबदबा
By Admin | Updated: November 22, 2014 23:30 IST2014-11-22T23:30:15+5:302014-11-22T23:30:15+5:30
अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे अकोला सद्भावना ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात विदर्भ अकोला संघाचा दबदबा राहिला. शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्रीपर्यंत मुलांच्या गटातील लढती पूर्ण झाल्या. खान्देश जळगाव संघ उपविजयी ठरला.

स्पोर्ट: ड्युल सद्भावना चॅम्पियनशिपमध्ये अकोल्याचा दबदबा
अ ोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे अकोला सद्भावना ड्युल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुलांच्या गटात विदर्भ अकोला संघाचा दबदबा राहिला. शुक्रवार, २१ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्रीपर्यंत मुलांच्या गटातील लढती पूर्ण झाल्या. खान्देश जळगाव संघ उपविजयी ठरला.विजेत्या बॉक्सरांमध्ये सुदर्शन येनकर, नजीर खान, वैभव लांबोरे, दीपक यादव, सय्यद साद, सागर शिरसाट, विक्की जांगळे, प्रज्वल डोंगरे, अजर अली, काजी नोमान, नितीन पवार, मनीष निमिया, रोहित सुरवाडे, आफताब अली, सचिन चव्हाण, ऋत्विक जगदाळे, शेख रेहान, सौरभ देशमुख, अभयचित तिवारी, शिवाजी गेडाम, पवन सातवे, आदित्य पटेल, सय्यद आवेश, सागर सोनोने, स्नेहांकित आठवले, अंश पटेकर, दीपक हिलम, सुमित खरात यांचा समावेश आहे. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन महापौर उज्ज्वला देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण शिक्षणाधिकारी संजय तेलगोटे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भ, मुन्ना ठाकूर, विजय गोटे, प्रा.जमील अहमद, राहुल घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार, २२ नोव्हेंबर रोजी मुलींच्या गटातील लढतींना सायंकाळपासून सुरुवात करण्यात आली.(क्रीडा प्रतिनिधी)फोटोकॅप्शन: स्पर्धेतील विजेते मान्यवरांसोबत. -२३सीटीसीएल२७...