दक्षिण आफ्रिकेची ङिाम्बाब्वेवर मात
By Admin | Updated: August 21, 2014 00:46 IST2014-08-21T00:46:08+5:302014-08-21T00:46:08+5:30
दक्षिण आफ्रिकेने दुस:या वनडे सामन्यात ङिाम्बाब्वेवर 61 धावांनी विजय मिळविला़ या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळवत मालिका खिशात टाकली आहे.

दक्षिण आफ्रिकेची ङिाम्बाब्वेवर मात
बुलावायो : फा डू प्लेसिसचे (55) शानदार अर्धशतक आणि रियॉन मॅक्लारेन आणि वेन पार्नेल (प्रत्येकी 3 बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने दुस:या वनडे सामन्यात ङिाम्बाब्वेवर 61 धावांनी विजय मिळविला़ या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळवत मालिका खिशात टाकली आहे.
आफ्रिकेने 49़4 षटकांत 257 धावा बनविल्यानंतर ङिाम्बाब्वेचा डाव 49़1 षटकांत 196 धावांत गुंडाळून सामन्यात बाजी मारली़ या लढतीत ङिाम्बाब्वे संघ पराभूत झाला असला तरी त्यांनी वनडे इतिहासात तिस:यांदा आफ्रिकन संघाचे सर्व फलंदाज तंबूत पाठवण्याची किमया साधली.
प्लेसिस याने 72 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार लगावल़े आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक याने 38 धावांचे योगदान दिल़े ज़े पी़ डय़ुमिनी (36), डेव्हिड मिलर (45), पार्नेल (24) आणि काईल एबोट याने 23 धावा केल्या़ ङिाम्बाब्वेकडून ब्रायन व्हिटोरी, प्रास्पर उत्सेया, जॉन एनयुयम्बू आणि सीन विलियम्स यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल़े आफ्रिकेने दिलेल्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात ङिाम्बाब्वेची एकवेळ 5 बाद 59 अशी अवस्था झाली होती़ या धक्क्यातून संघ अखेर्पयत सावरू शकला नाही़ त्यांच्याकडून सीन विलियम्स याने 55 धावांची खेळी केली़ आफ्रिकेकडून पार्नेल आणि मॅक्लारेन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करीत विजयात योगदान दिले, तर इमरान ताहीरने 2 बळी मिळविल़े (वृत्तसंस्था)
च्दक्षिण आफ्रिका : 49़4 षटकांत सर्वबाद 257़ (क्विंटन डी कॉक 38, फाफ डू प्लेसिस 55, ज़े पी़ डय़ुमिनी 36, डेव्हिड मिलर 45़ ब्रायन व्हिटोरी 2/57, प्रास्पर उत्सेया 2/39, जॉन एनयुम्बू 2/44, सीन विलियम्स 2/37)़
च्ङिाम्बाब्वे : 49़1 षटकांत सर्वबाद 196़ (सीन विलियम्स 55, एऩ मादविया 25, बी़ व्हिटोरी नाबाद 2क़् वेन पार्नेल 3/38, मॅक्लारेन 3/21, इमरान ताहीर 2/26