सोमदेवचे बँकॉक ओपनमधील आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: September 4, 2015 22:56 IST2015-09-04T22:56:55+5:302015-09-04T22:56:55+5:30

भारताचा सोमदेव देववर्मन याने उपांत्यपूर्व फेरीत चांगली सुरुवात केल्यानंतरही त्याचे एटीपी बँकॉक ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले

Somdev ends the challenge of Bangkok Open | सोमदेवचे बँकॉक ओपनमधील आव्हान संपुष्टात

सोमदेवचे बँकॉक ओपनमधील आव्हान संपुष्टात

बँकॉक : भारताचा सोमदेव देववर्मन याने उपांत्यपूर्व फेरीत चांगली सुरुवात केल्यानंतरही त्याचे एटीपी बँकॉक ओपन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. द्वितीय मानांकित सोमदेवने तैपेईच्या सहाव्या मानांकित खेळाडूला पहिल्या सेटमध्ये एकही गेम जिंकू दिला नाही; परंतु अखेर त्याला २ तास २२ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-0, ५-७, ३-६ असा पराभव पत्करावा लागला. या भारतीय खेळाडूला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी १४६0 डॉलर आणि १५ गुण प्राप्त झाले. त्याच्या पराभवाबरोबरच भारताचे देखील या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तो पुरुष दुहेरीत तैपेईचा आपला जोडीदार जिम्मी वाँगसोबत पहिल्याच फेरीत पराभूत झाला होता. रामकुमार रामनाथन एकेरी आणि दुहेरीच्या पहिल्या फेरीच्या पुढे जाऊ शकला नाही, तर एन. श्रीराम बालाजी दुसऱ्या फेरीत पराभूत झाला.

Web Title: Somdev ends the challenge of Bangkok Open