सोमदेवला कठीण ड्रॉ
By Admin | Updated: June 21, 2014 00:15 IST2014-06-21T00:15:34+5:302014-06-21T00:15:34+5:30
लंडन: भारताच्या सोमदेव देवबर्मनला विम्बल्डन टेनिस टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये पोलंडच्या १५ व्या मानांकित जॉर्जी जानोविचचा सामना करेल़

सोमदेवला कठीण ड्रॉ
ल डन: भारताच्या सोमदेव देवबर्मनला विम्बल्डन टेनिस टूर्नामेंटच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीमध्ये पोलंडच्या १५ व्या मानांकित जॉर्जी जानोविचचा सामना करेल़पुरुष एकेरीमध्ये भारताचा एकमेव प्रतिनिधी सोमदेवचे मार्ग एवढे सोपे राहणार नाही़ कारण, त्याला त्याच हाफमध्ये ठेवण्यात आले आहे़ यामुळे स्वित्झर्लंडच्या चौथ्या मानांकित रॉजर आणि पाचवे मानांकित स्टेनिसला वावरिंकाशिवाय अमेरिकेच्या नवव्या मानांकित जॉन इन्सरचादेखील समावेश आहे़ सोमदेव जर पुढील फेरीमध्ये उलटफेर करण्यात यशस्वी झाला तर त्याला पुढील फेरीत ऑस्ट्रेलियाच्या लेटन हेविट आणि पोलंडच्या मायकल पर्जीसेज्नी यांच्या लढतीतील विजेत्याशी होईल़पुरुष दुहेरीत अनुभव लिएंडर पेस आणि चेक गणराज्यचा त्याचा साथीदार राडेक स्टेपनेकला पाचवे मानांकित देण्यात आले आहे आणि ही जोडी आपल्या अभियानाची सुरुवात पोलंडच्या मारियूज फिस्टर्जेनबर्ग आणि अमेरिकेच्या राजीव राम यांच्याविरुद्ध करणार आहे़भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा एहसान उल हक कुरेशी या आठव्या मानांकित जोडीला पहिल्या फेरीत चेक गणराज्यच्या फ्रेंटिसक सरमेक आणि मिखाईल एल्निग या जोडीशी लढावे लागणार आहे़ पुरुष दुहेरीत दीविज शरण आणि पूरव राजादेखील भारताचे प्रतिनिधित्व करतील़दीविज आणि चिनी ताईपेचा त्याचा जोडीदार येन सून ल्यू आपल्या अभियानाची सुरुवात ब्रिटेनच्या जेमी डेल्गाडो आणि लग्जमबर्गच्या जॉईल्स म्यूलरविरुद्ध करेल़ पूरब आणि ब्राझीलच्या मार्सेलो डेमोलिनेर यांना पहिल्या फेरीत कोलंबियाच्या युऑन सेबेस्टियन आणि पोलंडच्या मार्सिन मातकोवस्की या १५ व्या मानांकित जोडीशी सामना करावा लागणार आहे़ यादरम्यान सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅक या चौथ्या मानांकित जोडीला महिला दुहेरीत आपल्या अभियानाची सुरुवात स्वित्झर्लंडच्या मार्टिन हिगिस आणि रशियाच्या वेरा ज्वोनारेवाविरुद्ध करावी लागणार आहे़ मिश्र दुहेरीचा ड्रॉ २५ जूनला होणार आहे. (वृत्तसंस्था)