संघर्षानंतर सोमदेव पराभूत

By Admin | Updated: June 25, 2014 02:37 IST2014-06-25T02:37:11+5:302014-06-25T02:37:11+5:30

जेर्जी जोनोविच याच्याविरुद्ध कडवी झुंज दिल्यानंतरही त्याला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडावे लागले.

Somdev defeats after struggling | संघर्षानंतर सोमदेव पराभूत

संघर्षानंतर सोमदेव पराभूत

>लंडन : भारताचा खेळाडू सोमदेव देवबर्मन याने तीन तास चार मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन सामन्यात 15 वा मानांकित पोलंडचा जेर्जी जोनोविच याच्याविरुद्ध कडवी झुंज दिल्यानंतरही त्याला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभूत होऊन बाहेर पडावे लागले.
 जोनोविचने सोमदेवचा 4-6, 6-3, 6-3, 3-6, 6-3 ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. गेल्या अनेक स्पर्धामध्ये पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची शृंखला सोमदेव विम्बल्डनमध्येही तोडू शकला नाही. विश्व क्रमवारीत 125 व्या स्थानावर असलेल्या सोमदेवने पहिला सेट जिंकून शानदार सुरुवात केली, पण नंतरचे दोन्ही सेटस् त्याने गमावले. पण आपल्या खेळाच्या बळावर त्याने उपस्थितांची मने जिंकली. सोमदेवने चौथा सेट 35 मिनिटांत 6-3 ने जिंकून सामन्यात 2-2 ने बरोबरी साधली होती. निर्णायक सेटमध्ये मात्र 25 वा मानांकित जोनोविचने अनुभव पणाला लावून विजय खेचून नेला. सोमदेवने सामन्यात 14 एस मारले. 11 वेळा चार ब्रेक पॉईंटचा लाभ घेतला. पोलंडच्या खेळाडूने 19 डबल फॉल्ट तसेच 6क् चुका केल्या तरीही निर्णायक क्षणी गुण मिळविण्यात तो यशस्वी ठरला.
जोकोविच, फेडरर दुस:या फेरीत
सर्बियाचा नोवाक जोकोविच, ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्वित्ङरलडचा स्टेनिसलास वावरिंका आणि चीनची ली ना, स्वित्ङरलडचा रॉजर फेडरर तसेच चौथी नामांकित पोलंडची एग्निस्का रंदावास्का यांनी दुसरी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)

Web Title: Somdev defeats after struggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.