सोलापूर अकॅडमी-गोल्ड स्टार यांना संयुक्त विजेतेपद

By Admin | Updated: August 21, 2014 21:45 IST2014-08-21T21:45:44+5:302014-08-21T21:45:44+5:30

सोलापूर: आमदार दिलीप माने चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोलापूर अकॅडमी व गोल्ड स्टार संघांना विभागून संयुक्त विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला़

Solapur Academy-Gold Star Joint Championship | सोलापूर अकॅडमी-गोल्ड स्टार यांना संयुक्त विजेतेपद

सोलापूर अकॅडमी-गोल्ड स्टार यांना संयुक्त विजेतेपद

लापूर: आमदार दिलीप माने चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोलापूर अकॅडमी व गोल्ड स्टार संघांना विभागून संयुक्त विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला़
अंतिम सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे प्रथम क्रमांकाचे 11054 रुपयांचे बक्षीस व 6054 रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आल़े गोल्डस्टारने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 9 षटकात 1 बाद 67 धावा केल्या़ त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील सामना होऊ शकला नाही़
या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार दिलीप माने यांच्या हस्ते झाल़े यावेळी सोलापूर जिल्हा क्रिकेट असो़चे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, क़ेटी़ पवार, क्रीडाधिकारी नजीर शेख, अँड़ बडेखान, अँड़ जैद नईम शेख, अहमद शेख, राजासाब शेख, संतोष कामाठी, प्रभाकर सादूल, प्रशांत कांबळे,राजा बागवान, हजरत शेख, अप्पा गडदे आदी उपस्थित होत़े
यासाठी संयोजन दिलीप माने सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सैफन शेख, प्लाझा क्रिकेट अकॅडमीचे नौशाद नदाफ, सर्फराज सय्यद, अहमद शेख यांनी पर्शिम घेतल़े आभारप्रदर्शन जोशी यांनी केल़े या स्पर्धेचे पंच म्हणून भारत वाले, सर्फराज सय्यद व प्रशांत शावंतूल यांनी काम पाहिल़े
पुरस्काराचे मानकरी-
मालिकावीर: मुन्ना शेख़
उत्कृष्ट फलंदाज: राहुल सोनवणे
उत्कृष्ट गोलंदाज: सचिन लोंढे
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक: अमर कारंड़े
फोटोओळी-
आमदार दिलीप माने चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या संयुक्त विजेतेपदाचा चषक सोलापूर अकॅडमी व गोल्ड स्टार संघाला देताना आमदार दिलीप माऩे त्यावेळी चंद्रकांत रेम्बसरू, सैफन शेख, क़ेटी़ पवार, अँड़ जैद शेख, अँड़ बडेखान, सर्फराज सय्यद, अप्पा गडदे, राजासाब शेख, अहमद शेख, मोहम्मद सादीक, राजा बागवान, हजरत शेख, प्रभाकर सादूल, संतोष कामाठी़

Web Title: Solapur Academy-Gold Star Joint Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.