त्यामुळे जेम्स अँडरसन निर्दोष - गॉर्डन
By Admin | Updated: August 4, 2014 02:58 IST2014-08-04T02:58:15+5:302014-08-04T02:58:15+5:30
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाविरुद्ध झालेल्या वादानंतर इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनवर कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते़

त्यामुळे जेम्स अँडरसन निर्दोष - गॉर्डन
लंडन : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाविरुद्ध झालेल्या वादानंतर इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनवर कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नव्हते़ त्यामुळे तो या प्रकरणातून निर्दोष सुटला, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियुक्त केलेल्या न्यायिक आयुक्त गॉर्डन लुईस यांनी व्यक्त केले़
गॉर्डन यांच्यासमोर अँडरसनविरुद्धच्या आरोपांची सुनावणी झाली होती़ या सुनावणीदरम्यान दोन्ही टीमचे साक्षीदार आपापल्या खेळाडूंची बाजू घेताना दिसले़ तसेच मैदानाची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने जडेजा आणि अँडरसन यांच्यात झालेला वाद बघितला नसल्याचे म्हटले़ याव्यतिरिक्त या दोन्ही खेळाडूंत झालेल्या वादावादीचा कोणताही आॅडिओ पुरावा मिळाला नाही़ तसेच टीव्ही फूटेजमध्येही अशी कोणतीच घटना दिसून आली नाही़ त्यामुळेच अँडरसनवर कोणतीही कारवाई झाली नाही, असेही त्यांनी सांगितले़ भारत व इंग्लंड यांच्यात टेंटब्रिजमधील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना अँडरसन आणि जडेजा यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती.