स्नेहा गुल्हानेची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 22:55 IST2019-09-11T22:54:34+5:302019-09-11T22:55:22+5:30
नोकरी व कुटुंब सांभाळून तिने जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

स्नेहा गुल्हानेची रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेत बाजी
अमरावती : मध्य प्रदेशातील इंदूर येथे नुकत्याच पार पडलेल्या १० मीटर रायफल प्री-नॅशनल शूटिंग स्पर्धेतून अमरावती येथील शार्प शूटिंग अॅकेडमीची खेळाडू स्नेहा अमोल गुल्हाने हिची १० मीटर रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली. स्नेहाने ४०० पैकी ३८० गुण पटकावले. ती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आहे. नोकरी व कुटुंब सांभाळून तिने जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर हे यश मिळविले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.