एसजेएएन
By Admin | Updated: July 1, 2014 22:37 IST2014-07-01T22:37:14+5:302014-07-01T22:37:14+5:30
मीडिया कर्मचाऱ्यांसाठी

एसजेएएन
म डिया कर्मचाऱ्यांसाठीआज पेनल्टी शूट आऊट स्पर्धेचे आयोजननागपूूर : जागतिक क्रीडा पत्रकार दिनानिमित्त स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरच्यावतीने (एसजेएएन) उद्या (दि.२) बुधवारी फुटबॉल पेनल्टी शूट आऊट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वाजेपासून रातुम नागपूर विद्यापीठ क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन होईल. या स्पर्धेत वृत्तपत्रातील कर्मचाऱ्यांचे संघ सहभागी होणार आहेत. पहिल्या तीन विजेत्या संघांना अनुक्रमे १०००, ७०० आणि ५०० रुपयांचा रोख पुरस्कार दिला जाईल. याच कार्यक्रमात राज्य महिला फुटबॉल स्पर्धेतील उपविजेत्या नागपूर संघातील मुलींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन एसजेएएनने केले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)