शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

भारताच्या सहा मुष्टीयोद्धांची अंतिम फेरीत धडक; चार भारतीय खेळाडूंनी केली कांस्य पदकाची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:29 AM

युवा विश्व चॅम्पियन शशी चोपडा (५७ किलो) याच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आशियाई खेळाच्या परीक्षण स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, तर चार अन्य खेळाडूंनी कांस्यपदक जिंकले.

जकार्ता : युवा विश्व चॅम्पियन शशी चोपडा (५७ किलो) याच्यासह सहा भारतीय मुष्टियोद्ध्यांनी आशियाई खेळाच्या परीक्षण स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली, तर चार अन्य खेळाडूंनी कांस्यपदक जिंकले.शशी आणि पवित्रा (६0 किलो) यांनी महिलांच्या ड्रॉमध्ये अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. पुरुषांत इंडिया ओपनचा सुवर्णपदकप्राप्त मनीष कौशिक (६0 किलो), श्यामकुमार (४९ किलो), शेख सलमान अन्वर (५२ किलो) व आशिष (६४) यांनी अंतिम फेरी गाठली.शशीने फिलिपाईन्सच्या रिजा पासुईतचा उपांत्य फेरीत ४-१ असा पराभव केला. आता तिची लढत थायलंडच्या रतचादापोर्न साओतोशी होईल. दुसरीकडे पवित्राने दक्षिण कोरियाच्या हवांग हेजंग हिचा ५-0 असा धुव्वा उडवला. तिची अंतिम फेरीत थायलंडच्या निलावन तेचासूप हिच्याशी गाठ पडेल.पुरुषांमध्ये राष्ट्रीय विजेत्या मनीषने चीनी तैपईच्या लाई चू येन याचा ५-0 असा पराभव केला. तो सुवर्णपदकासाठी जपानच्या रेंटारो किमुराविरुद्ध लढेल. ४९ किलो वजन गटात श्यामकुमार याच्याविरुद्ध मोहंमद फौद रेदजुआन याने माघार घेतली. श्यामकुमार इंडोनेशियाच्या मारियो ब्लासियूस याच्याशी दोन हात करील. तथापि, अन्वरने जपानच्या बाबा रुसेई याला ३-२ असे नमविले. आशिषने इंडोनेशियाच्या लिबर्टस घा याला नमवले. मोहंमद खान (५६ किलो), रितू ग्रेवाल (५१), पवन कुमार (६९) व आशिष कुमार (७५) यांनी कांस्यपदके जिंकली. (वृत्तसंस्था)- जिन्सन जॉन्सन याने पुरुषांच्या ८०० मीटर शर्यतीमध्ये सहजपणे सुवर्ण पदकाची कमाई केली. यासह भारताने १३ सुवर्ण पदकांसह एकूण २२ पदक जिंकण्यात यश मिळवले. भारतीय अ‍ॅथलेटिक्स खेळाडूंनी स्पर्धेच्या अंतिम दिवशी तीन सुवर्ण कमाई केली.भारताने पुरुष व महिलांच्या 4७400 मीटर स्पर्धेत सुवर्ण यश मिळवले. त्याचवेळी, सरिता सिंगने महिलांच्या तार गोळा फेकमध्ये रौप्य, तर कमलराज कणराज याने पुरुष तिहेरी उडीमध्ये कांस्य पटकावले. जॉन्सनने १ मिनिट ४७.९६ सेकंदासह सुवर्ण पटकावले. तार गोळाफेकमध्ये सरिताने गत आशियाई विजेत्या चीनच्या ल्यो ना को कोई (७२.११) नंतर ६१.७५ मीटरची फेक करुन रौप्य जिंकले.

टॅग्स :Sportsक्रीडा