शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सिंधू, श्रीकांत यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:23 AM

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

जकार्ता : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळवला.सिंधू व श्रीकांत यांनी अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीच्या सामन्यात जपानच्या अया ओहोरी व केंता निशिमोतो यांना पराभूत केले. या मोसमातील पहिले जेतेपद पटकावण्याच्या तयारीत असलेल्या सिंधूला आहोरी हिने चांगलीच लढत दिली. सिंधूने हा सामना ११-२१, २१-१५, २१-१५ असा जिंकला. या वर्षी इंडिया ओपनच्या अंतिम फेरीत पोहचलेल्या श्रीकांतने निशिमोतो याला फक्त ३८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१४, २१-१३ असे सहज पराभूत केले.ओहोरीविरुद्ध सिंधूचा हा सलग सातवा विजय आहे. श्रीकांतने निशिमोतोविरुद्ध पाचवा सामना जिंकला. निशिमोतो सहा पैकी फक्त एकदाच श्रीकांतचा पराभव करु शकला आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा पुढील सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिकफेल्ट व हॉँगकॉँगची यिप पुई यिन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.अन्य भारतीयांमध्ये एच. एस. प्रणॉय व बी. साईप्रणित यांना पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडावे लागले. प्रणितला वोंग विंग याने १५-२१, २१-१३, १०-२१ असे पराभूत केले. प्रणॉयला चीनच्या दुसऱ्या मानांकित शी युकीकडून संघर्षपूर्ण सामन्यात २१-१९, १८-२१, २०-२२ असे पराभूत व्हावे लागले.सात्विकसाईराज रंकी रेड्डी व अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरीतील जोडीला पहिल्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. विनी ओकताविना कंडो व तोनतोवी अहमद या जोडीने त्यांचा १३-२१, ११-२१ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton