सिंधूला सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

By Admin | Updated: January 29, 2017 19:27 IST2017-01-29T19:27:47+5:302017-01-29T19:27:47+5:30

भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.

Sindhu Sayyad Modi G.P. Badminton championship title | सिंधूला सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

सिंधूला सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 29 -  भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. आज झालेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत सिंधूने इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्कावर 21-13, 21-14 अशी मात करत विजेतेपदावर कब्जा केला. 
एकतर्फी झालेल्या या लढतीत सिंधूने सुरुवातीपासूनच आपला दबदबा राखला. तिने इंडोनेशियाच्या ग्रेगोरियाला कोणतीही संधी न देता पहिला गेम 21-13 अशा फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही सिंधूने आपले वर्चस्वा राखताना हा गेम 21-14 अशा फरकाने जिंकत सामन्यात 21-13, 21-14 अशी सरशी साधली.  

Web Title: Sindhu Sayyad Modi G.P. Badminton championship title