सिंधू, सायनाची रँकिंगमध्ये घसरण
By Admin | Updated: May 5, 2017 00:55 IST2017-05-05T00:55:30+5:302017-05-05T00:55:30+5:30
आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि माजी नंबर वन सायना नेहवाल या गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफच्या

सिंधू, सायनाची रँकिंगमध्ये घसरण
नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्य विजेती पी.व्ही. सिंधू आणि माजी नंबर वन सायना नेहवाल या गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफच्या ताज्या विश्वक्रमवारीत चौथ्या आणि नवव्या स्थानावर घसरल्या. चीनमधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सिंधू क्वॉर्टरफायनलमध्ये पराभूत झाली तर सायनाला पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पहावे लागले होते. पुरुष एकेरीत अजय जयराम हा १३ व्या सर्वोत्कृष्ट स्थानावर आहे. सिंगापूर ओपन सुपर सिरीज चॅम्पियन साईप्रणित २२ व्या स्थानावर आला. जगातील माजी नंबर तीन असलेला किदम्बी श्रीकांत २६ व्या आणि समीर वर्मा २७ व्या स्थानावर आहे. एच. एस. प्रणय ३० व्या तसेच सौरभ वर्मा ३९ व्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)