शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पूवम्मा, जोसेफ यांना रौप्य

By admin | Updated: June 5, 2015 01:04 IST

धावपटू मचेरिता राजू पूवम्मा आणि हेप्टाथलानपटू लिक्सी जोसफ यांनी गुरुवारी २१ व्या आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकांची कमाई केली.

वुहान : धावपटू मचेरिता राजू पूवम्मा आणि हेप्टाथलानपटू लिक्सी जोसफ यांनी गुरुवारी २१ व्या आशियाई अ‍ॅथ्लेटिक्स चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताने चार पदके पटकावली. २०१३ मध्येही या स्पर्धेत पूवम्माने भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते. महिलांच्या ४०० मीटरमध्ये पूवम्माने ५३.०७ सकेंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले. चीनची यांग हुइंजहेने ५२.३७ सेकंद वेळेसह शर्यत पूर्ण करताना सुवर्णपदक पटकावले. कजाखस्तानच्या अनास्तेशिया कुदिनोव्हाने कांस्यपदकाचा मान मिळवला. पहिल्या दिवशी सहाव्या स्थानावर असलेल्या जोसेफने ६.१९ मीटरचे अंतर गाठताना तिसरे स्थानावर झेप घेतली. भाला फेकमध्ये तिला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण ८०० मीटर दौड स्पर्धेत तिने अव्वल स्थान पटकावले. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना जोसेफने ५५५४ गुणांची कमाई करीत रौप्यपदकाचा मान मिळवला. माजी आशियाई ज्युनिअर चॅम्पियन पोर्णिमा हेंब्रमने ५५११ गुणांसह कांस्यपदक पटकावले. जी. लक्ष्मणनने ५ हजार मीटर दौड स्पर्धेत कांस्यपदकाचा मान मिळवला. दुती चंद, श्रावणी नंदा, जी.एम. पद्मिनी व सिनी सहदेवन यांचा समावेश असलेल्या महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघाला ४५.७२ सेकंद वेळसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पुरुषांचा ४ बाय १०० मीटर रिले संघ ३९.६७ सेकंद वेळेसह सहाव्या स्थानावर राहिला. पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत अंकित शर्मा (७.७६ मीटर) व कुमारावेल प्रेमकुमार (७.६९ मीटर) यांना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताच्या खात्यावर आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्यपदकांची नोंद आहे. पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेता आरोकया राजीव (४६.६५ सेकंद) सातव्या स्थानी राहिला. कतारच्या युवा अब्दलेलाह हारुनने ४४.६८ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाचा मान मिळवला. अन्य स्पर्धांमध्ये अनू राघवन महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५९.२८ सेकंद वेळसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. दुसऱ्या हिटमध्ये तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. युथ आॅलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा दुर्गेश कुमार पाल पुरुषांच्या ४०० मीटर शर्यतीत बाहेर झाला. बहुप्रतिक्षित १०० मीटर दौड स्पर्धेत नायजेरियामध्ये जन्मलेला कतारच्या फेरी ओनुनोडेने ९.९१ सेकंद वेळेसह सुवर्णपदकाचा मान मिळवला. त्याने चीनचा झांग पेइमेंग (१०.१५ सेकंद) व इराणचा रेजा घाजेमी (१०.१९ सेकंद) यांना पिछाडीवर सोडले. जपानच्या चिशातो फुकुशिमाने ११.२३ सेकंद वेळेसह महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. भारताची श्रावणी नंदा ११.४८ सेकंद वेळेसह पाचव्या स्थानी राहिली. (वृत्तसंस्था)