सिलिच यूएस ओपनचा ‘राजा’

By Admin | Updated: September 10, 2014 02:46 IST2014-09-10T02:46:19+5:302014-09-10T02:46:19+5:30

क्रोएशियाचा अव्वल टेनिसपटू मारिन सिलिच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा नवा ‘राजा’ बनला आहे़

Silicon US Open's 'King' | सिलिच यूएस ओपनचा ‘राजा’

सिलिच यूएस ओपनचा ‘राजा’

न्यूयॉर्क : क्रोएशियाचा अव्वल टेनिसपटू मारिन सिलिच अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा नवा ‘राजा’ बनला आहे़ पुरुष गटातील फायनलमध्ये सिलिच याने जपानच्या केई निशिकोरीवर शानदार विजय मिळवून स्पर्धेच्या अजिंक्यपदावर आपले नाव कोरले़ महिला गटात अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्स क्वीन ठरली़
स्पर्धेच्या पुरुष गटातील फायनलमध्ये सिलिच याने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या जपानच्या निशिकोरीचे जेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळविताना १ तास आणि ५४ मिनिटांत ६-३, ६-३, ६-३ अशी बाजी मारली आणि विजेतेपदाचा मान आपल्या नावे केला़
दरम्यान, १४ वे मानांकन प्राप्त सिलिच १३ वर्षांत पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलाच क्रोएशियन खेळाडू ठरला आहे़ यापूर्वी २००१ मध्ये त्यांच्या गोरान इवानिसेविच याने विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते़
विशेष म्हणजे सध्या गोरान सिलिच याचे प्रशिक्षक आहेत़ २००५ नंतर आॅस्ट्रेलियन ओपननंतर पहिल्यांदाच एखादा ग्रँड स्लॅम किताब सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, स्पेनचा राफेल नदाल, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्टार खेळाडूंना मिळविता आला नाही़ (वृत्तसंस्था)

Web Title: Silicon US Open's 'King'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.