शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

Sikandar Shaikh: मस्तच! पै. सिकंदर शेखने पंजाबच्या 'भूपेंद्र सिंग'ला दाखवलं अस्मान; 'भीमा'चं मैदान गाजवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 09:47 IST

sikandar shaikh kushti: महाराष्ट्र केसरीला मुकलेल्या सिंकदर शेखने भीमाचे मैदान गाजवले आहे. 

Kusti Dangal Solapur | सोलापूर : अलीकडेच पुण्यात बहुचर्चित अशा महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झालेल्या आणि त्यावरून वादात अडकलेल्या पैलवान सिकंदर शेखने सोलापूर येथे पार पडलेल्या स्पर्धेत पंजाबच्या पैलवानाला अस्मान दाखवून कुस्ती आपल्या नावावर केली. खासदार धनंजय महाडिक यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त 1 लाख रूपयांची ही स्पर्धा भरवण्यात आली होती. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे सिकंदर शेख खूप चर्चेत आला होती. दरम्यान, मोहोळ तालुक्याचा पैलवान सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्रसिंगविरूद्धचा डाव 2 मिनिटांत संपवून कुस्ती जिंकली. 

'महाराष्ट्र केसरी'मधील वादामुळे चर्चेत सिकंदर शेखवर महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अन्याय झाला असल्याचे त्याचे चाहते म्हणत आहेत. यावर खुद्द सिकंदरने स्पष्टीकरण देताना म्हटले होते, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."

पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणार - सिकंदर शेख तसेच पुढच्या वर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची गदा आणणार असल्याचेही सिंकदर शेखने म्हटले. "मागील खूप दिवसांपासून आमची तालीम महाराष्ट्र केसरीची वाट पाहत आहे. मी नक्कीच पुढच्या वर्षी कोल्हापूरात महाराष्ट्र केसरीची गदा आणेन", असे सिकंदरने म्हटले होते.  

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSolapurसोलापूर