Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:17 PM2022-01-13T14:17:50+5:302022-01-13T14:18:53+5:30

इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.

Shuttler Saina Nehwal goes down 17-21, 9-21 to Malvika Bansod in huge upset | Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला

Saina Nehwal : सायना नेहवालचा पराभव झाला; महाराष्ट्राच्या मालविका बनसोडनं इतिहास रचला

googlenewsNext

इंडियन ओपन २०२२ स्पर्धेतील सायना नेहवालचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडूला २० वर्षीय मालविका बनसोड ( Malvika Bansod) हिनं ३४ मिनिटांत पराभूत केले. महाराष्ट्रातील नागपूर येथील मालविकानं हा सामना २१-१७, २१-९ असा जिंकून स्पर्धेतील धक्कादायक निकालाची नोंद केली. 

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक  विजेत्या सायनानं बुधवारी पहिल्याच सामन्या झेक प्रजासत्ताकच्या टेरेझा स्व्हॅबिकोव्हाचा २२-२०, १-० असा पराभव केला. झेक प्रजासत्ताकच्या खेळाडूनं दुखापतीमुळे माघार घेतली. मालविकानं पहिल्या सामन्यात सामिया इमाद फारूकीवर २१-१८, २१-९ असा विजय मिळवला होता. 
 


 २००७नंतर स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सायनाला दुसऱ्यांदाच भारतीय खेळाडूकडून हार मानावी लागली आहे. २०१७मध्ये तिला याच स्पर्धेत पी व्ही सिंधूनं पराभूत केले होते.  

Web Title: Shuttler Saina Nehwal goes down 17-21, 9-21 to Malvika Bansod in huge upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.