श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 17:36 IST2026-03-31T17:35:06+5:302026-03-31T17:36:58+5:30

सोमैयाची अप्रतिम चाल अन् अथर्वची कोंडी

Shreyansh Somaiya Clinches Third Straight Title at All India Chess Masters Season 3 | श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय

श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय

मुंबई : श्रेयांश सोमैयाने सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला. त्याने यासह स्पर्धेत संयुक्तपणे आघाडी मिळवली. श्रेयांशसह आश्वी अग्रवाल, सोहम पवार, पलाश मापारा, प्रतीक यादनीक, राजवीर नहार, अनिरुद्ध अय्यर आणि अहान कातरूका यांनीही प्रत्येकी ३ गुणांसह संयुक्तपणे अग्रस्थान मिळवले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सोमैयाची अप्रतिम चाल; अथर्वची कोंडी

पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या बोर्डवर सोमैयाने काळ्या मोहऱ्यांनी खेळताना दमदार फाॅर्ममध्ये असलेल्या अथर्व पोलेकरचा (२ गुण) पराभव केला. संथ सुरुवात केल्यानंतर सोमैयाने अप्रतिम चाली रचत अथर्वची कोंडी करत त्याला चुका करण्यास भाग पाडले. पाचव्या बोर्डवर पलाश मापारानेही काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रेयस वाघमारेचा (२ गुण) पराभव करत सलग तिसरा विजय मिळवला. एएफएम सोहम पवारने सफेद मोहऱ्यांनी खेळताना सुरुवातीपासून नियंत्रण राखून अनिश कश्यपचा पराभव केला.

इतर निकाल 

(तिसरी फेरी) : तनुज, दयाल (२.५) बरोबरी वि. आकाशकुमार यादव (२.५); दीपक सोनी (२) पराभूत वि. आश्वी अग्रवाल (३); तिस्या पट्ट (२) पराभूत वि. प्रतीक यादनिक (३); ईशान जथान (२) पराभूत वि. राजवीर नहार (३); मेहुल तांडेल (२) पराभूत वि. अनिरुद्ध अय्यर(३); अहान कातरुका (३) विजयी वि. अभिजय बरुआ (२); पंकज बोरसे (२.५) बरोबरी नग. ओंकार गायकवाड (२.५).

Web Title : श्रेयांश की शतरंज में धाक: अखिल भारतीय मास्टर्स में हैट्रिक!

Web Summary : श्रेयांश सोमैया ने लगातार तीसरी जीत के साथ अखिल भारतीय शतरंज मास्टर्स में बढ़त बनाई। आश्वी अग्रवाल, सोहम पवार और अन्य संयुक्त रूप से शीर्ष पर हैं, जो मुंबई चेस सेंटर में ज़ोरदार प्रतिस्पर्धा दिखा रहे हैं।

Web Title : Shreyansh's Chess Dominance: Achieves Hat-Trick at All India Masters

Web Summary : Shreyansh Somaiya leads the All India Chess Masters after securing his third consecutive victory. Ashwi Agarwal, Soham Pawar, and others share the top spot, showcasing intense competition at the Mumbai Chess Centre.