पदकफेरी गाठण्यात नेमबाजी संघ अपयशी; नेमबाजी विश्वचषक स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 05:48 IST2025-07-14T05:47:53+5:302025-07-14T05:48:00+5:30

लक्ष्य आणि नीरू यांनी पात्रता फेरीत संभाव्य १५० पैकी १४० गुण मिळवून ५४ जोड्यांमध्ये १० वे स्थान पटकावले.

Shooting team fails to reach medal round | पदकफेरी गाठण्यात नेमबाजी संघ अपयशी; नेमबाजी विश्वचषक स्पर्धा

पदकफेरी गाठण्यात नेमबाजी संघ अपयशी; नेमबाजी विश्वचषक स्पर्धा

लोनाटो : लक्ष्य शेओरन (२२, १९, २५) आणि नीरू धांडा (२५, २४, २५) तिसऱ्या मालिकेत परिपूर्ण गुण मिळवूनही ट्रॅप मिश्र संघ पदक फेरीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. त्यामुळे आयएसएसएफ लोनाटो विश्वचषकातील भारताची मोहीम संपुष्टात आली आहे. 

लक्ष्य आणि नीरू यांनी पात्रता फेरीत संभाव्य १५० पैकी १४० गुण मिळवून ५४ जोड्यांमध्ये १० वे स्थान पटकावले. जोरावर सिंग संधू (२१, २३, २४) आणि प्रीती रजक (२३, २४, २३) ही दुसरी भारतीय जोडी १३८ गुणांसह २२व्या स्थानावर राहिली. एक दिवस आधी महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिलेल्या नीरूने प्रभावी कामगिरी सुरू ठेवली आणि ७५ पैकी फक्त एक लक्ष्य चुकवले तर लक्ष्यने दुसऱ्या मालिकेत आपली लय गमावली आणि सहा लक्ष्य चुकवले. ज्यामुळे भारतीय जोडीच्या पदक फेरीत पोहोचण्याच्या संधींना धक्का बसला. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि स्पेन हे दोघेही १४३ गुणांसह पात्रता फेरीत अव्वल स्थानावर होते.  

निकोसिया शॉटगन विश्वचषकात मिश्र सांघिक स्पर्धेत कायनन आणि साबिरा जोडीने कांस्यपदक जिंकले होते.

Web Title: Shooting team fails to reach medal round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.