कोरोनामुळे भारतात नेमबाजीचा सराव असुरक्षित!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:32 AM2021-05-09T05:32:46+5:302021-05-09T05:33:34+5:30

भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे.

Shooting practice unsafe in India due to corona | कोरोनामुळे भारतात नेमबाजीचा सराव असुरक्षित!

कोरोनामुळे भारतात नेमबाजीचा सराव असुरक्षित!

Next

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची रायफल नेमबाज अंजुम मुद्‌गिल हिने कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या भारतात सराव करणे असुरक्षित असल्याचे म्हटले आहे. भारताऐवजी क्रोएशियात सराव करणे हितावह असेल, असे मत तिने व्यक्त केले. (Shooting practice unsafe in India due to corona)

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे भारतीय नेमबाजांचे १५ सदस्यांचे पथक ११ मे रोजी जगरेबला रवाना होणार आहे. तेथूनच हे खेळाडू थेट टोक्योकडे प्रस्थान करतील. टोक्यो ऑलिम्पिक २३ जुलैपासूृन सुरू होईल. त्याआधी क्रोएशिया येथे २० मे ते ६ जून दरम्यान होणाऱ्या युरोपियन चॅम्पियनशिप व त्यानंतर २२ जून ते ३ जुलै या कालावधीत आयोजित विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडू सहभागी होतील.

साईने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत मुद्‌गिल म्हणाली,‘ भारतात सध्या सराव करणे योग्य नाही. माझ्याकडे ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनसाठी खासगी रेंज उपलब्ध नाही. त्यासाठी मला दिल्ली किंवा पुण्यात जावे लागेल. तथापि, सद्यस्थितीत ही दोन्ही शहरे कोरोनामुळे सर्वांत असुरक्षित आहेत. भारताच्या तुलनेत क्रोएशिया हे सुरक्षित स्थळ असून, संघासोबत वास्तव्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. आम्हाला घरापासून दूर राहण्यात कुठलीही अडचण नाही.’

भारतीय संघ क्रोएशियात दाखल झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन असेल. दोन्ही स्पर्धा खेळल्यानंतर १७ जुलै रोजी टोक्योकडे रवाना होईल. चंदीगडची ही नेमबाज पुढे म्हणाली,‘साईने आमच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. याशिवाय बायोबबल तयार करण्यात आले आहे. दीर्घकाळ ब्रेकनंतर सांघिकपणे सराव करण्याचा लाभ आत्मविश्वास उंचाविण्यात होईल. मी लसीचे दोन्ही डोज घेतले असून, इतरांनीही लसीकरण करून घ्यावे, असे माझे आवाहन आहे. ’

Web Title: Shooting practice unsafe in India due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app