युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 04:45 IST2018-10-13T04:44:49+5:302018-10-13T04:45:25+5:30
नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

युवा आॅलिम्पिकमध्ये नेमबाज मनू भाकरचा रौप्य वेध
ब्युनास आयर्स : नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र गटात ताजिकिस्तानच्या बेहजान फायेजुलाएवसह रौप्य जिंकले. सुवर्ण पदकाच्या सामन्यात जर्मनीच्या वानेसा सीगर व बल्गेरियाच्या किरिल किरोव यांच्याकडून मनू - बेहजान यांचा ३-१० असा पराभव झाला. भारताने २ सुवर्ण व ३ रौप्य पदकांसह नेमबाजी स्पर्धेची सांगता केली.
पुरुष हॉकीमध्ये भारताने उपांत्यपूर्व फेरीत पोलंडला ४-२ असे नमवले. शिवम आनंदने पहिल्या व आठव्या मिनिटाला गोल केल्यानंतर मनिंदर सिंग व संजय यांनी १७व्या मिनिटाला गोल केला. बॅडमिंटनमध्ये संभाव्य विजेता असलेल्या लक्ष्य सेनने जपानच्या केदाई नाराओका याचा १४-२१, २१-१५, २४-२२ असा पराभव केला. याआधी युय्वा आॅलिम्पिकमध्ये एकेरीत भारताला एकही सुवर्ण मिळवता आलेले नाही.