नेमबाज ऐश्वर्य तोमरने मिळवून दिला भारताला ऑलिम्पिक कोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:11 AM2019-11-11T04:11:24+5:302019-11-11T04:11:45+5:30

नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने रविवारी येथे १४ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले.

Shooter Aishwarya Tomar earns Olympic quota for India | नेमबाज ऐश्वर्य तोमरने मिळवून दिला भारताला ऑलिम्पिक कोटा

नेमबाज ऐश्वर्य तोमरने मिळवून दिला भारताला ऑलिम्पिक कोटा

Next

दोहा : नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने रविवारी येथे १४ व्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले. या शानदार कामगिरीसह त्याने भारताला आॅलिम्पिक नेमबाजीमध्ये विक्रमी १३ वा ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला.
तोमरने ८ खेळाडूंच्या अंतिम फेरीत ४४९.१ गुणांची नोंद करीत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या किम जोंगयुन (४५९.९) सुवर्ण पटकावले. चीनचा झोंगहाओ झाओ (४५९.१) रौप्यपदकाचा मानकरी ठरले.
१८ वर्षीय भारतीय नेमबाजने १२० शॉटच्या पात्रता फेरीत ११६८ अंकांसह अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवले. या स्पर्धेत तीन कोटा निश्चित होणार होते. लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये भारताचे ११ नेमबाज सहभागी झाले होते, तर रिओ आॅलिम्पिक २०१६ मध्ये १२ भारतीय नेमबाज पात्र ठरले होते.
मध्य प्रदेशातील खरगौनमध्ये राहणाऱ्या तोमरने जर्मनीच्या सुहलमध्ये आयएसएसएफ ज्युनिअर विश्वचषकमध्ये रायफल थ्री पोझिशनमध्ये ज्युनिअर गटात विश्वविक्रम नोंदवला होता. तोमर रायफल थ्री पोझिशनमध्ये संजीव राजपूतनंतर कोटा मिळवणारा दुसरा भारतीय नेमबाज आहे. तोमर प्रथमच वरिष्ठ पातळीवर खेळत आहे. त्याने ज्युनिअर पातळीवर आशियात विजय मिळवला आणि त्यानंतर स्थानिक स्पर्धांमध्ये संजीव राजपूतसारख्या नेमबाजाला पिछाडीवर सोडत वरिष्ठ संघात स्थान मिळवण्याची दावेदारी सादर केली.
अंगद, मेराज यांचीही छाप
अंगदवीर सिंग बाजवा व मेराज अहमद यांनी स्कीट स्पर्धेत अनुक्रमे अव्वल व दुसरे स्थान पटकावत भारतासाठी आणखी दोन आॅलिम्पिक कोटा मिळवले. यासह टोकियो आॅलिम्पिकसाठी भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत विक्रमी १५ कोटा मिळवले. दोन्ही खेळाडू ५६ गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. त्यानंतर विजेत्याचा निर्णय शूटआॅफमध्ये झाला. अंगदने शूटआॅफमध्ये मेराजचा ६-५ ने पराभव केला. मनू भाकर व अभिषेक वर्मा यांच्या जोडीने सौरभ चौधरी व यशस्विनी सिंग देशवाल या जोडीला १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिक स्पर्धेत १६-१० ने पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले. (वृत्तसंस्था)
>भारताची सर्वोत्तम कामगिरी
आॅलिम्पिक कोटाच्या बाबतीत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये भारताचे ११ नेमबाज सहभागी झाले होते. त्यानंतर रियो आॅलिम्पिक २०१६ मध्ये १२ भारतीय नेमबाज सहभागी झाले होते. रविवारी भारताने तीन आॅलिम्पिक कोटा स्थान मिळवले. त्यामुळे आता आगामी टोकियो आॅलिम्पिकमध्ये किमान १५ नेमबाजांकडून भारताला पदकाची अपेक्षा असेल. चीनचा जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावरील झाओ आणि कोरियाचा नवव्या क्रमांकावरील जोंगुयन यांच्या व्यतिरिक्त कजाखस्तानचा अनुभवी नेमबाज युरी युरकोव्ह व इराणचा महयार सेदाघाट या स्पर्धेत सहभागी होते. अंतिम फेरीसाठी चीनचे दोन खेळाडू दाखल झाले, कोटा मिळवण्यासाठी त्यांना दावा सादर करता आला नाही. चीनने या प्रकारात यापूर्वीच दोन कोटा स्थान मिळविलेले आहेत. कोरियाचा जोंगयुननेही यापूर्वी म्युनिच विश्वचषकमध्ये कोटा मिळवला होता. त्यामुळे टोकियो आॅलिम्पिकच्या तीन स्थानांसाठी तोमर, इराण, कजाखस्थान, मंगोलिया व थायलंडच्या नेमबाजांमध्ये स्पर्धा होती.तोमरने फॉर्म कायम राखताना ‘निलिंग पोझिशन’च्या १५ शॉटमध्ये १५१.७ गुण नोंदवले. त्यानंतर ‘प्रोन पोझिशन’मध्ये त्याने तेवढ्याच शॉटमध्ये १५६.३ अंकांची कमाई केली. अखेर ४४९.१ अंकांसह तो तिसºया स्थानी राहिला. इराण व कजाखस्तानच्या नेमबाजांनी अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान पटकावत उर्वरित दोन कोटा स्थान मिळवले. या स्पर्धेत सहभागी झालेले अन्य भारतीय खेलाडूंमध्ये चैन सिंग पात्रता फेरीत १७ व्या आणि पारुल कुमार २० व्या स्थानी राहिला.

Web Title: Shooter Aishwarya Tomar earns Olympic quota for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.