Football Fight Video: तुफान राडा... फुटबॉलचं मैदान एका मिनिटांत बनलं रणांगण! पाहा नक्की काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 17:28 IST2022-01-16T17:28:19+5:302022-01-16T17:28:58+5:30
एका खेळाडूने तर थेट दुसऱ्या खेळाडूच्या तोंडावरच बुक्का मारला अन् तो जमिनीवर कोसळला.

Football Fight Video: तुफान राडा... फुटबॉलचं मैदान एका मिनिटांत बनलं रणांगण! पाहा नक्की काय घडलं
Viral Video, Africa cup of nations 2022: आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धेत घाना आणि गॅबॉन यांच्यातील सामन्यात खेळाडूंमध्ये तुफान राडा आणि हाणामारी पाहायला मिळाली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं. या हाणामारीत एका खेळाडूंच्या तोंडावर जोरदार बुक्काही लागला.
गॅबॉन संघ सामन्यात १-० ने मागे पडला होता. पण आयत्या वेळी त्यांनी १ गोल करत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर सामना संपण्याची शिटी वाजताच घानाचा खेळाडू बेंजामिन टेटे आणि गॅबॉनचा आरोन बौपेन्ड्जा यांच्यात राडा झाला. टेटेने आरोनचा तोंडावर जोरदार बुक्काही मारला. यावेळी दोन्ही संघांचे खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांमध्येही हाणामारी झाली.
बेंजामिन टेटेला मिळालं 'रेड कार्ड'
सामन्यानंतर बेंजामिन टेटेने केलेल्या गैरवर्तनामुळे त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे आता त्याच्यावर सामना बंदीची कारवाई होणं नक्की आहे. कर्णधार आंद्रे अयूवने १८व्या मिनिटाला गोल करत घानाला आघाडी मिळवून दिली होती. पण जिम अलेविनाने ८८व्या मिनिटाला गोल करत बरोबरी केली.