शिव थापाला रौप्यपदक
By Admin | Updated: May 7, 2017 00:36 IST2017-05-07T00:36:07+5:302017-05-07T00:36:07+5:30
भारताचा बॉकसर शिव थापा याला आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दुखापतीमुळे रौप्यपदकावर समाधान मानावे

शिव थापाला रौप्यपदक
ताश्कंद : भारताचा बॉकसर शिव थापा याला आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दुखापतीमुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
६० किलो वजन गटात अंतिम फेरीत सुरुवातीच्या फेरीच्या शेवटच्या सेकंदाला शिवला एलनूर अब्दुराईमोव्हकडून दुखापत झाली. त्यामुळे पंचांनी बाउट थांबवली होती. शिव वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, की आज मी रौप्यपदक मिळवले, तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रताही मिळवली. या दोन्ही गोष्टीमुळे मी आज आनंदी आहे.
भारतासाठी आजचा दिवस थोडा निराशेचाही ठरला. गौरव बिधूडी (५६ किलो) आणि मनीष पवार (८१ किलो) वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या बॉकस आॅफमध्ये पराभूत झाले. गौरवला जपानच्या रयोमेई टनाकाने तर मनीषला पाकिस्तानच्या अवेस अली खानकडून पराभूत झाला. वर्ल्ड चॅम्पियनशिप आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये जर्मनीत आयोजिण्यात येणार असून या स्पर्धेत आशियाई चॅम्पियनशिपमधील प्रत्येक वजन गटातील अव्वल सहा बॉक्सर पात्र ठरणार आहेत.