शिर्के, ठाकूर घेणार न्या. लोढा पॅनलची भेट
By Admin | Updated: July 24, 2016 04:17 IST2016-07-24T04:17:09+5:302016-07-24T04:17:09+5:30
बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के हे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्या. आर. एन. लोढा यांच्या पॅनलची भेट घेणार आहेत. बीसीसीआयमधील प्रशासकीय

शिर्के, ठाकूर घेणार न्या. लोढा पॅनलची भेट
नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के हे सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्या. आर. एन. लोढा यांच्या पॅनलची भेट घेणार आहेत. बीसीसीआयमधील प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी या पॅनलची स्थापना करण्यात आली आहे.
ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार ठाकूर आणि शिर्के यांनी ही भेट स्वत: मागितली असून, राज्य संघटनेला दिलेल्या अधिकाराबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर व्हावा, असे त्यांचे मत आहे. ठाकूर आणि शिर्के यांच्यासोबत बीसीसीआयचे वकीलदेखील जाण्याची शक्यता आहे.
लोढा पॅनलने काम सुरू केले असून, १८ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बंगाल, तसेच कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीस स्थगिती देण्यात आली. त्याचप्रमाणे १९ जुलै रोजी झालेली जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेची निवडणूकदेखील रद्द घोषित करण्यात आली आहे.
या निवडणुकीत राज्याचे विद्यमान मंत्री इम्रान रझा अन्सारी हे अध्यक्षपदी विराजमान झाले होते.
(वृत्तसंस्था)