‘त्या’ पत्रकाराची तुलना गेलशी
By Admin | Updated: January 12, 2016 04:15 IST2016-01-12T04:15:56+5:302016-01-12T04:15:56+5:30
आॅन एअर आपल्या महिला मैत्रिणीशी गळाभेट घेतल्यामुळे आॅस्ट्रेलियातील एका टीव्ही पत्रकाराला टीकेचा सामना करावा लागत आहे. या पत्रकाराची तुलना आता वेस्ट इंडिजचा

‘त्या’ पत्रकाराची तुलना गेलशी
मेलबोर्न : आॅन एअर आपल्या महिला मैत्रिणीशी गळाभेट घेतल्यामुळे आॅस्ट्रेलियातील एका टीव्ही पत्रकाराला टीकेचा सामना करावा लागत आहे. या पत्रकाराची तुलना आता वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याच्याशी होत आहे. नुकतीच एका महिला पत्रकाराबद्दल आपत्तीजनक टीका केल्यामुळे गेल चर्चेत आला होता.
या प्रकारामुळे चॅनल सेव्हनचा क्रीडा पत्रकार हामिश मॅक्लाचलन याला माफी मागावी लागली आहे. एका लाईव्ह कार्यक्रमादरम्यान हामिशने मैत्रीण मोनिको रादुलोविच हिच्याशी गळाभेट घेतली होती. विशेष म्हणजे हामिशने गळाभेट घेतली तेव्हा मोनिको कॅमेऱ्यावर काही तरी बोलण्याचा प्रयत्न करीत होती.
हा प्रकार झाला तेव्हा मोनिको गोल्ड कोस्टवर मॅजिक मिलियन हॉर्स सेल येथे रिपोर्टिंग करीत होती. तेव्हा ४० वर्षीय हामिशही तेथे उपस्थित होता. तो हॉर्स रेस आणि आॅस्ट्रेलियन फुटबॉल लीगचे समालोचन करीत होता. येथे मोनिको घोड्यांच्या लिलाव कार्यक्रमात बोलत होती. तेव्हा हामिशने या महिला पत्रकाराची गळाभेट घेतली. या प्रकारानंतर त्याच्यावर टीका होत आहे. (वृत्तसंस्था)