शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीच संचालकपदी

By admin | Updated: September 14, 2015 00:36 IST

पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

नवी दिल्ली : पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सध्यातरी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा तिढा सुटला आहे.रविवारी याबाबतीत अधिकृतरीत्या जाहीर करताना बीसीसीआयने शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवताना संजय बांगर, भरत अरुण आणि श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांच्या कार्यकाळामध्येही टी-२० विश्वचषकपर्यंत वाढ केली आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या वतीने हा निर्णय घण्यात आला. याबाबत बीसीसीआयने सांगितले की, सध्या टीम इंडियाची कामगिरी शानदार होत आहे. तसेच कोचिंग स्टाफने देखील उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने आम्ही हा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला. याचीही शक्यता...सध्या बीसीसीआय आपल्या इतर कामांमध्ये व्यस्त आहे. यामुळे शास्त्री आणि सहय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याचे चर्चा होत आहे. नुकताच काही दिवसांपुर्वी सचिन ठाकूर यांनी आगामी दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेपुर्वी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र या निर्णयामुळे प्रशिक्षकपदाच्या महत्त्वाच्या निवड प्रक्रियेसाठी बीसीसीआय अतिरीक्त वेळ घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. (वृत्तसंस्था)