राष्ट्रीय पिस्तुल शुटींग स्पर्धेत शर्वरी भोईरला कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 16:19 IST2019-01-17T16:17:54+5:302019-01-17T16:19:13+5:30
देशपातळीवरील स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावणारी शर्वरी ही मुंबई, ठाणे विभागातील पहिलीच युवती

राष्ट्रीय पिस्तुल शुटींग स्पर्धेत शर्वरी भोईरला कांस्यपदक
डोंबिवली- बालेवाडी, पुणे येथे खेलो इंडिया खेलो या संकल्पनेअंतर्गत मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय पिस्तुल शुटींग स्पर्धेत डोंबिवलीची शुटर शर्वरी जितेंद्र भोईर हिने ब्राँझ पदक पटकावले. देशपातळीवरील स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावणारी शर्वरी ही मुंबई, ठाणे विभागातील पहिलीच युवती असल्याचे तिचे प्रशिक्षक संयुक्ता हसमनसीस यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी देशभरातून १६ जणांची निवड झाली होती, त्यापैकी ८ जणांची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली, त्यापैकी बहुतांशी हे सुवर्णपदक पटकावलेले मातब्बर स्पर्धक होते. अटीतटीच्या स्पर्धेत शर्वरी हिने ब्राँझ पदक पटकावून डोंबिवली नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. गन फॉर ग्लोरी अकादमी येथे ती प्रशिक्षण घेत आहे.