शरत-अंमलराजला दुहेरीत टेटेचे रौप्य
By Admin | Updated: August 3, 2014 00:01 IST2014-08-03T00:01:12+5:302014-08-03T00:01:12+5:30
अचंता शरत कमल आणि अॅन्थोनी अंमलराज यांच्या जोडीने येथे सुरू असलेल्या 2क्व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतासाठी टेबल टेनिस प्रकारात रौप्यपदक जिंकले.

शरत-अंमलराजला दुहेरीत टेटेचे रौप्य
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : चार बॉक्सर्स अंतिम फेरीत
ग्लास्गो : अचंता शरत कमल आणि अॅन्थोनी अंमलराज यांच्या जोडीने येथे सुरू असलेल्या 2क्व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारतासाठी टेबल टेनिस प्रकारात रौप्यपदक जिंकले. ऑलिम्पिक कांस्यविजेता विजेंदरसिंग याच्या नेतृत्वात चार बॉक्सर्स अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे किमान चार पदके निश्चित झाली आहेत.
महिलांच्या थाळीफेकीत सीमा पुनिया हिने यंदाच्या मोसमात सवरेत्कृष्ट कामगिरी करीत रौप्याची मानकरी ठरली, त्याचवेळी गतस्पर्धेची चॅम्पियन कृष्णा पुनिया चक्क पाचव्या स्थानावर फेकली गेली. दिल्ली राष्ट्रकुल 2क्1क्मध्ये कांस्य आणि त्या आधी 2क्क्6च्या मेलबोर्न स्पर्धेत रौप्यविजेती सीमाने दुस:या प्रय}ात 58.87 मीटर थाळीफेक करीत तिसरे स्थान घेतले. पाचव्या प्रय}ात मात्र या 31 वर्षाच्या खेळाडूने 61.61 मीटर अंतर पूर्ण करीत रौप्यपदकावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाची डॅनी सॅम्युअल्सने 64.88 मीटर फेक करीत सुवर्ण जिंकले. इंग्लंडची ङोड लैली तिस:या स्थानावर राहिली. शरत- अंमलराज ही जोडी अंतिम सामन्यात सिंगापूरचे खेळाडू निंग गाओ- ह्यू ली यांच्याकडून पराभूत झाल्याने टेटेमध्ये पहिल्या रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ही जोडी 1-3(11-8, 7-11, 9-11, 5-11) ने पराभूत झाली. शरतने एकेरीचीही उपांत्य फेरी गाठली आहे.
बॉक्सिंगमध्ये मनदीपला उत्तर आर्यलडचा खेळाडू स्टीव्हन डोनेली याला पराभूत करण्यासाठी प्रय}ांची पराकाष्ठा करावी लागली. डोनेलीने पहिल्या फेरीत 1क्-9ने सरशी साधली, तर नंतरच्या दोन्ही फे:या मनदीपने जिंकल्या. 22 वर्षाच्या देवेंद्रोने वेल्सच्या अे विलियम्सवर 3-क्ने मात केली.(वृत्तसंस्था)
4सीमा पुनियाचे थाळीफेकीतील रौप्य वगळता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय अॅथलीटकडून संमिश्र कामगिरी घडली. कृष्णा पुनिया चक्क पाचव्या स्थानावर घसरल्यामुळे निराशा झाली. काल विकास गौडाने भारताला 56 वर्षात पहिल्यांदा थाळीफेकीचे सुवर्ण जिंकून दिले होते.
4सीमा विकासची बरोबरी करू शकली नाही; पण वैयक्तिक सवरेत्कृष्ट कामगिरीची नोंद मात्र ती करू शकली.महिलांच्या उंच उडीत भारताची सहाना नागराज 1.86 मीटर उडीसह 11 खेळाडूंमध्ये आठव्या स्थानावर फेकली गेली. ऑस्ट्रेलियाची इलोनोर पॅटरसन हिने 1.94 मीटरसह सुवर्णपदक जिंकले.
4मोहम्मद पठाण पुराकल, जेतू बेबी, जिबीन सॅबेस्टियन आणि राजीव यांचा समावेश असलेला पुरुषांचा 4 बाय 4क्क् मीटर रिले संघ सुरुवातीलाच अपात्र ठरला.
4महिलांचा 4 बाय 4क्क् मीटर रिले संघ मात्र अंतिम फेरीत धडक देण्यात यशस्वी ठरला. देवश्री मुजुमदार, टिंटू लुका, अश्विनी अकूंजी आणि एम. आर. पुवम्मा यांच्या संघाने 3.33: 67 अशी वेळ नोंदवून हिटमध्ये पाचवे स्थान मिळविले. श्रद्धा नारायण, आशा राय, श्रवणी नंदा आणि एच. एम. ज्योती यांच्या 4 बाय 1क्क् मीटर रिले संघाने अंतिम फेरी गाठली. पुरुषांच्या तिहेरी उडीत अरविंदर अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. त्याने अखेरच्या प्रय}ात 16.51 मी. उडी घेतली. पुरुष भालाफेकीत रवींद्रसिंग खैरा व विपिन्ना कासना हे क्रमश: 11 व 12व्या स्थानावर राहिले.
कश्यप अंतिम फेरीत, सिंधू पराभूत
4भारतीय बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा असलेल्या पी. कश्यप याने शनिवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या एकेरीची अंतिम फेरी गाठली. महिला गटात मात्र पी. व्ही. सिंधू हिला उपांत्य फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले.
4मागील राष्ट्रकुलचा कांस्यविजेता असलेल्या 27 वर्षाच्या कश्यपने उपांत्य लढतीत इंग्लंडचा राजीव ओसेफ याचा 18-21, 21-17, 21-18ने पराभव केला. पण, पदकाच्या चढाओढीत अग्रक्रमावर असलेली सिंधू मात्र कॅनडाची मिशेल ली हिच्याकडून 2क्-22, 2क्-22 अशा फरकाने पराभूत झाली.
4कश्यपने प्रतिस्पर्धी खेळाडूचे कडवे आव्हान 83 मिनिटांत संपविले. कश्यपने पहिला गेम थोडय़ा फरकाने 18-21ने गमावला; पण लगेचच मुसंडी मारताना पुढील दोन्ही गेम जिंकले.
4कश्यपला अंतिम फेरीत भारताचा गुरुसाई दत्त आणि सिंगापूरचा डेरेक वोंग यांच्यात खेळल्या जाणा:या दुस:या उपांत्य सामन्यातील विजेत्याविरुद्ध दोन हातकरावे लागतील.
4विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी असलेली सिंधू हिचा पराभव अनेकांना खटकला. ती आता कांस्यपदकासाठी सामना खेळणार आहे.
51 किलो वजन गटात
पिंकी राणी उपांत्य सामन्यात पराभूत होताच तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
लैशराम सरिता देवीला महिलांच्या 57 ते 6क् किलो गटात मुष्टीयुद्धमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दवेंद्रोला 49 किलो गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत देवेंद्रोला आर्यलडच्या पॅडी बारनेसविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
सकिनाला पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्य
कर्नाटकच्या सकिना खातून हिने 2क् व्या राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी महिला पॉवरलिफ्टिंगमध्ये 61 किलो वजन गटात कांस्यपदकाचा मान मिळविला. नायजेरियाची इस्थर ओयेमा व इंग्लंडची नताली ब्लॅक अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाच्या मानकरी ठरल्या. सकिनाने एकूण 88.2 किलो वजन उचलले. इस्थारने 156 किलो व नतालीने 1क्क्.2 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली.
संघाबरोबर असणो महत्त्वाचे : बोल्ट
ग्लास्गो येथे मी देशासाठी रिले संघाबरोबर आलो आहे. देशासाठी खेळणो आणि संघाबरोबर राहणो माङयासाठी नेहमी महत्त्वाचे असते. पहिल्या फेरीत मी थोडा हळू पळालो. मला माहीत आहे, की पळताना लय मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो. पुढील फेरीत ती लय मला नक्की मिळेल. मो फराह आणि योहाना ब्लॅक यांच्या माघारीमुळे अॅथलेटिक्समधील आकर्षण कमी झाले असल्याचे जगातील वेगवान धावपटू जमेकाचा उसेन बोल्ट याने सांगितले.
मी पूर्ण तंदुरुस्त नव्हते : पुनिया
मी पूर्णपणो तंदुरुस्त नसल्याने राष्ट्रकुल स्पर्धेत खराब कामगिरी झाली. माङया जांघेत दुखणो उमळल्याने फिट वाटत नव्हते. एक वेळ तर स्पर्धेतून माघार घेण्याचाही विचार मनात आला; पण कोचने दबाव वाढविल्यामुळे नाइलाजाने खेळावे लागले, असे ऑलिम्पियन आणि गत राष्ट्रकुल स्पर्धेची चॅम्पियन थाळीफेकपटू कृष्णा पुनिया हिने वृत्तसंस्थेस सांगितले.
देश सुवर्ण रौप्य कास्य
इंग्लंड5क्5346
ऑस्ट्रेलिया424क्44
कॅनडा3क्1431
स्कॉटलंड171418
भारत142516