डोपिंग बंदीनंतर शारापोवाचे विजयी पुनरागमन

By Admin | Updated: April 28, 2017 02:03 IST2017-04-28T02:03:30+5:302017-04-28T02:03:30+5:30

डोपिंगच्या आरोपाखाली १५ महिन्यांच्या बंदीचा सामना करणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिने टेनिस कोर्टवर विजयी पुनरागमन केले.

Sharapova's return to victory after doping ban | डोपिंग बंदीनंतर शारापोवाचे विजयी पुनरागमन

डोपिंग बंदीनंतर शारापोवाचे विजयी पुनरागमन

स्टुटगार्ट : डोपिंगच्या आरोपाखाली १५ महिन्यांच्या बंदीचा सामना करणारी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिने टेनिस कोर्टवर विजयी पुनरागमन केले.
पाच वेळेची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन, जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू शारापोवाने इटलीची ३६ वी मानांकित राबर्टा विंची हिच्यावर ७-५, ६-३ ने विजय नोंदविला. विजयानंतर शारापोवाने कोर्टवर परतण्याची प्रतीक्षा करताना वाईट वाटत होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर जो आनंद मिळाला तो व्यक्त करायला शब्द नसल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sharapova's return to victory after doping ban