ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये शारापोव्हा - सेरेना आमनेसामने
By Admin | Updated: January 29, 2015 13:58 IST2015-01-29T13:18:43+5:302015-01-29T13:58:29+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अंतिम टप्प्यावर पोचली असून रशियाची मारिया शारापोव्हा व अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांच्यादरम्यान विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये शारापोव्हा - सेरेना आमनेसामने
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा अंतिम टप्प्यावर पोचली असून रशियाची मारिया शारापोव्हा व अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांच्यादरम्यान विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे.
गुरूवारी झालेल्या उपांत्य फेरीत शारापोव्हा व सेरेनाने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. मारिया शारापोव्हाने एकातोरिना माकारोव्हा हिचा ६-३ , ६-२ असा पराभव करत चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने उपांत्य फेरीत मॅडिसन किजला ७-६,६-२ असे हरवले.
आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत एकूण १८ ग्रँडस्लॅम पटकावणा-या सेरेनाने पाच वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर मारिया शारापोव्हानेही २००८ साली स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे या दोघांमधील सामना अतिशय रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.