शकिरी विरुद्ध मेस्सी सामना रंगणार
By Admin | Updated: July 1, 2014 00:56 IST2014-07-01T00:56:20+5:302014-07-01T00:56:20+5:30
अर्जेटिना संघ लियोनेल मेस्सीच्या बळावर स्वित्ङरलडला धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल,

शकिरी विरुद्ध मेस्सी सामना रंगणार
>साओ पाउलो : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत उत्कृष्ट खेळ करणारा अर्जेटिना संघ लियोनेल मेस्सीच्या बळावर स्वित्ङरलडला धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल, तर स्वित्ङरलड संघ हॅट्ट्रिक मास्टर ङोरदान शकिरीच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारण्यासाठी आतुर असेल़
वर्ल्डकपमधील अखेरच्या होंडुरासविरुद्धच्या साखळी लढतीत गोलची हॅट्ट्रिक साजरी करून स्वित्ङरलडला अंतिम 16 संघांत जागा मिळवून देणा:या शकिरीच्या कामगिरीवर या लढतीत सर्वाची नजर असणार आह़े दुसरीकडे अर्जेटिना संघातही मेस्सीसारखा स्टार खेळाडू आह़े त्याने केलेल्या शानदार कामगिरीच्या बळावर संघ अंतिम 16 संघांत आपले स्थान मिळवू शकला आह़े त्यामुळे ही लढत शकिरी विरुद्ध मेस्सी अशीच होणार आह़े
अर्जेटिनाचा मेस्सी आणि स्वित्ङरलडचा शकिरी यांनी वर्ल्डकप स्पर्धेत आतार्पयत संघाला एकहाती विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आह़े मंगळवारी होणा:या लढतीत दोन्ही खेळाडू कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असतील़ सामन्याबद्दल अर्जेटिनाचा मिडफिल्डर ङोविअर मेशेरानो म्हणाला, ‘‘स्वित्ङरलड अनुभवी संघ आह़े आमच्याविरुद्धच्या सामन्यात हा संघ नक्कीच उत्कृष्ट खेळ करण्यावर भर देईल यात शंका नाही़ त्यांच्या संघातील शकिरी आणि फॉरवर्ड हॅरिस सेफेरोविक हे स्टार खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत़ त्यामुळे या लढतीत आम्हाला सावधान राहावे लागणार आह़े’’
एकीकडे अर्जेटिना संघ शकिरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष रणनीती बनवीत आहे, तर स्वीस संघ मेस्सीला रोखण्यासाठी सज्ज झाला आह़े 27 वर्षीय मेस्सीने वर्ल्डकपमध्ये आतार्पयत चार गोल नोंदविले आहेत़ तो सध्या आपल्या संघाकडून सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू आह़े स्वित्ङरलडविरुद्धच्या लढतीतही त्याने गोलचा धडाका सुरूच ठेवावा, अशी संघाकडून अपेक्षा असणार आह़े
अर्जेटिना तिस:यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आह़े मात्र, संघातील दुखापतग्रस्त फॉरवर्ड सर्गियो एग्युरो स्वित्ङरलडविरुद्ध खेळणार नाही़ त्याच्या जागी एजेगुएल लावेजी याला संघात संधी मिळेल़
स्वीस संघाने 1954 नंतर एकदाही फुटबॉल वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेला नाही़ मात्र, या वेळी त्यांना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याची संधी आह़े मात्र, त्यांच्यासमोर बलाढय़ अर्जेटिनाचे आव्हान असल्यामुळे त्यांचा पुढच्या फेरीचा रस्ता सोपा नाही़ सध्याच्या वर्ल्डकपमधील सवरेत्कृष्ट चार संघांत अर्जेटिनाचा समावेश आह़े या संघाने वर्ल्डकपच्या साखळी लढतीतील तीनही सामने जिंकून थाटात पुढची फेरी गाठली होती़
यापूर्वी दोन्ही संघांत सहा सामने झाले आहेत़
या सहा सामन्यांत अर्जेटिनाने बाजी मारली आह़े
2012 मध्ये स्वित्ङरलडची अर्जेटिनाविरुद्ध मैत्रीय लढत झाली होती़
या लढतीत अर्जेटिनाने 3-1 असा विजय मिळविला होता़
मेस्सीने या सामन्यात कारकिर्दीतली पहिली हॅट्ट्रिक नोंदविली होती़
सध्याच्या वर्ल्डकपमधील सवरेत्कृष्ट चार संघांत अर्जेटिनाचा समावेश आह़े या संघाने वर्ल्डकपच्या साखळी लढतीतील तीनही सामने जिंकून थाटात पुढची फेरी गाठली होती़