शाकेर सय्यदला दोन सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 23:01 IST2017-11-16T23:01:00+5:302017-11-16T23:01:11+5:30

औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू शाकेर सय्यद याने दोंडाईचा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली.

Shaker Sayyed has two gold coins | शाकेर सय्यदला दोन सुवर्ण

शाकेर सय्यदला दोन सुवर्ण


औरंगाबाद : औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू शाकेर सय्यद याने दोंडाईचा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या फॉईल सांघिक प्रकारात आणि वैयक्तिक प्रकारात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्याला साई केंद्राचे प्रशिक्षक तुकाराम मेहेत्रे, सागर मगरे, अजय त्रिभुवन व स्वप्नील तांगडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल त्याचे राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, एनआयएस कुस्ती मार्गदर्शक संजय भूमकर आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Shaker Sayyed has two gold coins