शाहरुखला पुन्हा समन्स

By Admin | Updated: October 27, 2015 23:49 IST2015-10-27T23:49:30+5:302015-10-27T23:49:30+5:30

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक बॉलिवूड स्टार शाहरुख खान याने संघाचे शेअर विकून परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याप्रकरणी

Shahrukh Khan summoned again | शाहरुखला पुन्हा समन्स

शाहरुखला पुन्हा समन्स

नवी दिल्ली : आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक बॉलिवूड स्टार शाहरुख खान याने संघाचे शेअर विकून परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) भंग केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ‘टाइम्स नाऊ’ने मंगळवारी हे वृत्त दिले. याआधी मे २०१५मध्ये शाहरुखला अशाच प्रकारची नोटीस पाठविण्यात आली होती.
शेअर हस्तांतर प्रक्रियेत किंमत कमी दाखवून फेमा कायद्याचा भंग केल्याचा कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रा. लिमिटेडचे सहमालक शाहरुख, जुही चावला तसेच जुहीचा पती जय मेहता यांच्यावर संशय आहे. २००८मध्ये केकेआरचे शेअर मॉरिशसच्या कंपनीला कमी किमतीत विकल्याचे भासविण्यात आल्याचे ईडीला वाटते.
शाहरुख शहराबाहेर असल्याने त्याने उपस्थित राहण्यास ईडीकडे आणखी वेळ मागितल्याचे वृत्तात पुढे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Shahrukh Khan summoned again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.