सेटो, लाकोर्ड, जोहान्ससन यांना सुवर्ण
By Admin | Updated: August 9, 2015 22:38 IST2015-08-09T22:38:08+5:302015-08-09T22:38:08+5:30
जपानचा सेटो डय्या, फ्रान्सचा लाकोर्ड कामेली आणि स्वीडनची जोहोन्सन जेनी यांनी जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

सेटो, लाकोर्ड, जोहान्ससन यांना सुवर्ण
कझान : जपानचा सेटो डय्या, फ्रान्सचा लाकोर्ड कामेली आणि स्वीडनची जोहोन्सन जेनी यांनी जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
पुरुषांच्या ४०० मीटर वैयक्तिक मिडले प्रकारात जपानच्या सेटो डय्याने ४ मिनिट ०८.५० सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या ५० मिटर बॅकस्टोकमध्ये फ्रान्सच्या लाकोर्ड कामेलीने २४.२३ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
महिलांच्या ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात स्वीडनच्या जोहान्ससन जेनीने ३०.०५ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत चीन १४ सुवर्ण, १० रौप्य व १० कांस्यपदकांसह (एकूण ३४) आघाडीवर आहे.(वृत्तसंस्था)