ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तारखा ठरवा, आयओसीचे आंतररराष्ट्रीय क्रीडा महासंघांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 07:19 IST2020-05-20T01:38:34+5:302020-05-20T07:19:22+5:30
१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे.

ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या तारखा ठरवा, आयओसीचे आंतररराष्ट्रीय क्रीडा महासंघांना निर्देश
लुसाने : कोरोनामुळे स्थगित वा रद्द करण्यात आलेल्या अनेक टोकियो आॅलिम्पिक पात्रता स्पर्धांच्या नव्या तारखांना अंतिम रूप देण्याचे काम पूर्ण करा, असे निर्देश आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक समितीने आंतरराष्टÑीय महासंघांना दिले आहेत.
मागच्या महिन्यात आयओसीने टोकियो आॅलिम्पिकच्या पात्रतेसाठी २९ जून २०२१ ही मर्यादा निश्चित केली होती. कोरोनामुळे यंदा होणारे आॅलिम्पिक आयोजन वर्षभर लांबणीवर टाकण्यात आले आहे.
१५ मे रोजी साधलेल्या संवादात आयओसीने आंतरराष्ट्रीय महासंघांच्या वेळापत्रकातील अनिश्चितता पाहता स्पर्धांची तारीख आणि स्थान याचा निर्णय झालेला नाही. तथापि आता पात्रता फेरी लवकरात लवकर पूर्ण करायची असल्याने सर्वांनी पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
एखाद्या खेळाची आॅलिम्पिक पात्रता फेरी शक्य न झाल्यास आयओसीचे क्रीडा संचालन व्यवस्थापक क्रीडा महासंंघाच्या संपर्कात राहून आणीबाणीच्या स्थितीत योजना तयार करतील. कोरोनाचा प्रकोप पुढेही कायम राहिल्यास आणीबाणी योजना लागू करणे आवश्यक आहे काय, याचा आढावा घेण्यात येईल. टोकियो आॅलिम्पिकचा खर्च वाचविण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचेदेखील आयओसीने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)