बेलिंडाकडून सेरेना पराभूत

By Admin | Updated: August 16, 2015 22:50 IST2015-08-16T22:50:06+5:302015-08-16T22:50:06+5:30

स्विसची युवा खेळाडू बेलिंडा बेनसिचने डब्ल्यूटीए रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या

Serena lost to Belinda | बेलिंडाकडून सेरेना पराभूत

बेलिंडाकडून सेरेना पराभूत

टोरंटो : स्विसची युवा खेळाडू बेलिंडा बेनसिचने डब्ल्यूटीए रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेत चुरशीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला तीन सेटममध्ये झालेल्या लढतीत पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्वित्झर्लंडच्या अठरा वर्षीय बेलिंडाने २१ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेत्या अनुभवी सेरेनाला दोन तास २८ मिनिटे चाललेल्या लढतीत ३-६, ७-५, ६-४ असे नमवले. सेरेनाचा या वर्षी हा दुसरा पराभव आहे.
या विजयाचा आनंद काही औरच आहे. त्याचे आपण शब्दांत वर्णन करू शकत नसलो, तरी हा अद्भुत आणि अवर्णनीय विजय असल्याची प्रतिक्रिया बेलिंडा बेनसिच हिने व्यक्त केली आहे. अंतिम फेरीत तिचा सामना रोमानियाच्या सिमोना हालेप हिच्याशी होणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Serena lost to Belinda