शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना व मरे उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 3, 2015 00:27 IST

तिस-या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने आॅस्ट्रेलियन टेनिसपटू डोमिनिक थिएमचा पराभव करीत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

मियामी : तिस-या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेने आॅस्ट्रेलियन टेनिसपटू डोमिनिक थिएमचा पराभव करीत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने मियामी टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. मियामी टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात मरे व बेर्दिच आणि महिला विभागात सेरेना व हालेप यांच्यादरम्यान लढती रंगणार आहेत. मरेने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत डोमिनिकची झुंज ३-६, ६-४, ६-१ ने मोडून काढली. मरेला उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्दिचच्या आव्हनाला सामोरे जावे लागणार आहे. मरेचा हा कारकिर्दीतील ५०१ वा विजय ठरला. मरेला जागतिक क्रमवारीत ५२ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्धच्या लढतीत संघर्ष करावा लागला. आॅस्ट्रेलियन खेळाडूने बॅकहँडच्या फटक्यांचा मुक्तपणे वापर करीत पहिला सेट ६-३ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सूर गवसलेल्या मरेने थिएमची सर्व्हिस ब्रेक करीत ३-१ अशी आघाडी घेतली. निर्णायक सेटमध्ये मरेने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत विजयावर शिक्कामोर्तब केले. आठव्या मानांकित बेर्दिचने अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोचा ६-३, ६-४ ने सहज पराभव केला. वर्षातील पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत बेर्दिच व मरे यांच्यादरम्यान उपांत्य फेरीत लढत झाली होती. त्यात स्कॉटिश खेळाडूने चार सेटमध्ये विजय मिळवला होता. महिला विभागात अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सला उपांत्य फेरी गाठताना घाम गाळावा लागला. बुधवारी कारकिर्दीतील ७०० वा विजय मिळवणाऱ्या सेरेनाने निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जर्मनीच्या सबाईन लिसिकीचा ७-६, १-६, ६-३ ने पराभव केला. सेरेनाला उपांत्य फेरीत रोमानियाच्या सिमोना हालेपच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हालेपने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या स्लोएन स्टिफन्सचा ६-१, ७-५ ने पराभव केला. यापूर्वी इंडियन वेल्स स्पर्धेतही हालेप व सेरेना यांच्यादरम्यान उपांत्य फेरीची लढत रंगणार होती, पण अमेरिकन खेळाडूने दुखापतीमुळे या लढतीतून माघार घेतली होती. यानंतर हालेपने येलेना यांकोविचचा पराभव करीत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)