सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:10+5:302015-08-02T22:55:10+5:30
नाशिक दि. २ (प्रतिनिधी) : सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ मार्शल आर्ट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, एस. एम. पाटील, हेरंब गोविलकर उपस्थित होते. संस्थेचे संचालक गोपाल सेंच्युरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान
न शिक दि. २ (प्रतिनिधी) : सेल्फ डिफेन्स स्कूल ऑफ मार्शल आर्ट संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांना बेल्ट वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षांच्या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, एस. एम. पाटील, हेरंब गोविलकर उपस्थित होते. संस्थेचे संचालक गोपाल सेंच्युरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमप्रसंगी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान करण्यात आला. प्रशिक्षक जयेश संेच्युरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. डॉ. योगेश कोठारी, प्रवीण पवार (ब्लॅक बेल्ट), राधिका पांढारकर, उत्तम राणा, वैशाली भगत (ब्राऊन बेल्ट), मंगेश पवार (पर्पल बेल्ट), तनुज श्रीकृष्ण राजहंस, वैशाली भगत (ब्लू बेल्ट), ओंकार वाघ, दीपाली परमानंद नरवाडे (ऑरेंज बेल्ट), डॉ. विक्रम चकोर, ओंकार काळे, कामिनी वाघ, पिंकी कंजम, भक्ती भोज, विशाल सुरवाडे, अनिल सहानी (येलो बेल्ट) यांना बेल्ट प्रदान करण्यात आले. फोटो स्कॅनला दिलेला आहे. ०२पीएचएयु....