अश्विनच्या पत्नीच्या उत्तराने सेहवाग झाला निरुत्तर
By Admin | Updated: October 13, 2016 17:41 IST2016-10-13T17:21:54+5:302016-10-13T17:41:57+5:30
कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर सेहवागने मजेशीर टिवट केले. सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.

अश्विनच्या पत्नीच्या उत्तराने सेहवाग झाला निरुत्तर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - एकेकाळी मैदानावर गोलंदाजांना फटकावणारा भारतीय संघाचा धडाकेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग सध्या टि्वटरवर जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. त्याने केलेल्या टि्वटसमुळे तो सतत चर्चेत असतो. त्याच्या हजरजबाबी टि्वटसचे अनेक टि्वटरकरांनी कौतुक देखील केले होते. त्याच्या टि्वटसला अनेकजण रिटि्वट देखील करत असतात. यावेळी त्याने भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विनला टार्गेट केलं खरं पण त्यामध्ये दोघांच्या पत्नींनी सहभाग घेतल्यामुळे हे संभाषण अधिकचं रोमांचक झालं.
नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर सेहवागने मजेशीर टि्वट केले. सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले.
सातव्यांदा मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनला शुभेच्छा, फक्त विवाहित पुरूषालाच घरी लवकर जाण्याचे महत्त्व समजू शकते, असे मजेशीर टि्वट सेहवागने केले. सेहवागच्या या टि्वटवर अश्विनच्या पत्नीला हसू अनावर झाले. अश्विनच्या पत्नीने सेहवागला त्वरित रिप्लाय देखील दिला. इतकेच नव्हे, तर सेहवागच्या पत्नीनेही टि्वट केले. सेहवागच्या मजेशीर टि्वटची दखल अश्विननेही घेतली. आणि त्याला प्रतिउत्तर दिले. त्यांचे ह संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलां. नेटकरी मंडळींना यामधून मनोरंजन झालं असेल हे मात्र नक्की.
दरम्यान, तिसऱ्या इंदूर कसोटीमध्ये आर. अश्विनने दोन्ही डावात मिळून १३ विकेट्स घेतल्या, तर संपूर्ण कसोटी मालिकेत त्याच्या नावावर २७ विकेट्स आहेत. त्याच्या याच कामगिरीबद्दल त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. 39 व्या कसोटीत त्याचा हा सातवा मालिकावीर पुरस्कार आहे.