केमच्या उत्तरेश्वर हायस्कूलची निवड
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:08+5:302014-10-04T22:55:08+5:30
केम :

केमच्या उत्तरेश्वर हायस्कूलची निवड
क म : करमाळा तालुक्यातील केम येथील र्शी उत्तरेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली़ सोलापुरात झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत प्रशालेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केल़े14 वर्षे वयोगटातील थाळीफेकमध्ये ज्ञानेश्वर घाडगे, गोळाफेकमध्ये प्रणव मोळीक याने प्रथम क्रमांक पटकावला़ 17 वर्षे वयोगटात 100 मी़ धावणे स्पर्धेत दत्तात्रय भिसे प्रथम, थाळीफेकमध्ये निखिल कुर्डे तर भालाफेकमध्ये ऋषीकेश कुबेरने तृतीय क्रमांक पटकावला़ 19 वर्षे वयोगटातील भालाफेकमध्ये सोनाली तळेकर प्रथम तर 800 मी़ धावणे स्पर्धेत आर्शू बिचुकले द्वितीय आली़त्यांना क्रीडाशिक्षक अमोल तळेकर, डी़ए़ मुलाणी यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे प्राचार्य आदिनाथ सातव, पर्यवेक्षक व्ही़आऱ पांडव यांनी कौतुक केल़ेफोटोओळी-विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेल्या केम येथील र्शी उत्तरेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत आदिनाथ सातव, अमोल तळेकर, डी़ए़ मुलाणी आदी़