शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

शिर्केंच्या नावावर शिक्कामोर्तब; ठाकुर करतील घोषणा

By admin | Updated: May 22, 2016 02:37 IST

आपण सचिवपद स्वीकारणार नाही, अशी ‘गुगली’ टाकणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचेच नाव सचिवपदासाठी आघाडीवर आहे. त्यांनाच भक्कम दावेदार मानले जात आहे.

सचिन कोरडे,  गोवाआपण सचिवपद स्वीकारणार नाही, अशी ‘गुगली’ टाकणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचेच नाव सचिवपदासाठी आघाडीवर आहे. त्यांनाच भक्कम दावेदार मानले जात आहे. त्यामुळे रविवारी (दि.२२) होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत सचिवपदाचीही औपचारिक घोषणा करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास अनुराग ठाकूर यांच्या जागी अजय शिर्के बीसीसीआयचे नवे सचिव बनतील. अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे जवळपास निश्चित झाले आहे. ठाकूर अध्यक्ष बनल्यानंतर स्वत: सचिवपदाची घोषणा करतील. आमसभेसाठी देशभरातील राज्य संघटनांचे पदाधिकारी शनिवारपासून मुंबईत आहेत. आमसभा रविवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल. त्यामुळे अर्ध्या तासात अध्यक्ष आणि सचिवांच्या नावाची घोषणा करण्यात येईल, असेही गोवा क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अभिनंदनासाठी शनिवारी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत विविध राज्य संघटनांतील सदस्य तसेच पदाधिकाऱ्यांनी शिर्के यांना आपले समर्थन जाहीर केले.