भारत - आफ्रिका कसोटीतील दुस-या दिवसाचा खेळ पाण्यात

By Admin | Updated: November 15, 2015 16:58 IST2015-11-15T16:55:24+5:302015-11-15T16:58:36+5:30

बेंगळुरु येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामधील दुस-या कसोटीतील दुस-या दिवसाचा खेळ पाण्यामुळे रद्द झाला.

Second day in the India-Africa Test, in the water | भारत - आफ्रिका कसोटीतील दुस-या दिवसाचा खेळ पाण्यात

भारत - आफ्रिका कसोटीतील दुस-या दिवसाचा खेळ पाण्यात

ऑनलाइन लोकमत

बेंगळुरु, दि. १५ -  बेंगळुरु येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामधील दुस-या कसोटीतील दुस-या दिवसाचा खेळ पाण्यामुळे रद्द झाला. उद्या हवामान चांगले असल्यास सकाळी सव्वा नऊ वाजता खेळ सुरु करण्यात येणार आहे. 

बेंगळुरु येथील दुस-या कसोटीत भारताच्या फिरकी मा-यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली व आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या २१४ धावांमध्ये संपुष्टात आला होता. भारतानेही पहिल्या दिवस अखेर बिनबाद ८० धावा करत दमदार सुरुवात केली होती. बेंगळुरुत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने दुस-या दिवशीचा खेळ सुरु होण्यास विलंबाने सुरु होईल असे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र लंचनंतरही पाऊस न थांबल्याने पंचांनी दुस-या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.  

Web Title: Second day in the India-Africa Test, in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.