शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

खेलो इंडियामध्ये सलग दुसऱ्या वर्षीही २५६ पदकांसह महाराष्ट्र अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 22:12 IST

दुस-या खेलो इंडिया स्पर्धेत २२७ पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. यंदा मात्र, त्यापेक्षाही अधिक २५६ पदकांची कमाई करुन महाराष्ट्र अजिंक्य ठरला आहे. त्यापाठोपाठ हरियाणा २०० पदाकांसह द्वितीय आणि दिल्ली १२२ पदकांसह तृतीय क्रमांकवर आहे.

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुस-या वर्षी विजेतेपद पटकाविले. मागील वर्षी पुण्यात झालेल्या दुस-या खेलो इंडिया स्पर्धेत २२७ पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले होते. यंदा मात्र, त्यापेक्षाही अधिक २५६ पदकांची कमाई करुन महाराष्ट्र अजिंक्य ठरला आहे. त्यापाठोपाठ हरियाणा २०० पदाकांसह द्वितीय आणि दिल्ली १२२ पदकांसह तृतीय क्रमांकवर आहे.

    गुवाहटी येथील नबीन चंद्र बार्डोली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री रामेश्वर तेली, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, अर्थमंत्री हेमंत विश्वकुमार यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या संघाला सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे सहसचिव इम्तियाझ काझी, सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक आनंद व्यंकेश्वर, चंद्रकांत कांबळे, महाराष्ट्राचे पथक प्रमुख विजय संतान, महाव्यवस्थापक अरुण पाटील यांसह सर्व संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते. राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

    महाराष्ट्राच्या संघाने राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे, क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे, सहाय्यक संचालक उदय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मोठे यश मिळविले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि १०१ ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे. हरियाणाने ६८ सुवर्ण, ६० रौप्य आणि ७२ ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे. दिल्लीने ३९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ४७  ब्रॉंझ पदकांची कमाई केली आहे.

    रामेश्वर तेली म्हणाले, ग्रामीण भागातील मुलांना मैदानावर आणण्याचे काम खेलो इंडिया चळवळीने सार्थ केले आहे. राष्ट्रीय पातळीवरच या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळाला. सर्वानंद सोनोवाल यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे कौतुक करताना त्यांचे आभारही मानले. तुमच्या कौशल्याने आणि कामगिरीने आसामला या खेलो इंडियामध्ये वेगळी ओळख मिळाली. तुम्ही आसामला मोठे केले आणि देशाची युवा ताकदही दाखवून दिली.

    यशाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाचे सहसचिव इम्तियाझ काझी म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खेळाडूंकरीता दिलेल्या सर्व  सुविधा आणि सराव शिबीरे यांमुळे तसेच खेळाडूंच्या उत्तम कामगिरीमुळे पदकांचा द्विशतकी आकडा यंदाही पार करणे शक्य झाले. तसेच गुवाहटी येथे येण्याकरीता विमानप्रवास व पुन्हा जाण्याकरीता रेल्वेची वातानुकुलित श्रेणीमध्ये प्रवासाची सर्व खेळाडूंना सुविधा देण्यात आली. पुढीलवर्षी देखील असेच यश खेळाडू मिळवतील.* यंदाच्या स्पर्धेतील घवघवीत यश    यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्राने २० पैकी १९ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. यातील जलतरणात सर्वाधिक ४६ पदकांची (१८, १५, १३) कमाई केली आहे. त्याखालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये ४०, कुस्ती ३१, अ‍ॅथलेटिक्स २९, वेटलिफ्टिंग २५ पदके महाराष्ट्राने मिळविली. तसेच यंदाच्या खेलो इंडिया युथ क्रीडा स्पर्धेत सायकलिंग क्रीडा स्पर्धेचा नव्याने समावेश झाला. स्थानिक व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची उंचावणारी कामगिरी पाहता या खेळाडूंकडून खेलो इंडिया स्पर्धेत पदकांची कमाई होणार याची खात्री होती. त्याप्रमाणे महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचे एकूण ५९० खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले असून याशिवाय मार्गदर्शक, प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापक, सहव्यवस्थापक असे १४५ मिळून एकूण ७३५ जणांचा समूह स्पर्धेकरीता आला होता.

    घरच्या मैदानावर पुण्यामध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले होते. त्यावेळी देखील महाराष्ट्राने एकूण २२७ पदकांसह विजेतेपद मिळविताना ८५ सुवर्ण, ६१ रौप्य, ८१ कांस्य पदके मिळविली होती. यामध्ये महाराष्ट्राला जलतरणात सर्वाधिक ४२ पदके मिळाली होती. यामध्ये १८ सुवर्ण, १४ रौप्य, १० कांस्यपदकांचा समावेश होता. जिम्नॅस्टिकमधील (१४, १३, १२) ३९ पदके, तर, मैदानी स्पर्धेतील ३३ पदकांची (१३, ८, १२) जोड मिळाली होती. बॉक्सिंगमध्येही २३ पदके मिळाली होती. तर, पहिल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने १३ खेळांच्या प्रकारांत ३६ सुवर्ण, ३२ रौप्य, ४३ ब्रॉंझ पदकांसह एकूण ११ पदके मिळवित द्वितीय स्थान पटकाविले होते.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्र