शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

सर्च टॅलेंट पोर्टल पुढील महिन्यापासून

By admin | Updated: October 6, 2016 05:01 IST

देशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही; केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

सचिन कोरडे / पणजीदेशात ‘टॅलेंट’ची कमतरता नाही; केवळ शोध घेण्याची गरज आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारने ‘सर्च टॅलेंट पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून हे पोर्टल साकारले असून पुढील महिन्यात ते सुरू होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘ब्रिक्स’ या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी गोयल गोव्यात आले होते, त्या वेळी त्यांनी संवाद साधला.गोयल म्हणाले, ‘‘देशातील मुलांना ‘खरी संधी’ मिळावी, या उद्देशाने हे ‘पोर्टल’ सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा विभागाने घेतला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील मुलांना आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळेल. त्यांना स्पर्धेतील सहभाग, प्रदर्शन, कौशल्य, मोबाईल, ई-मेल आदी माहितीचा व्हिडीओ या पोर्टलवर अपलोड करावा लागेल. या पोर्टलवर आलेल्या सर्व व्हिडीओंचा क्रीडातज्ज्ञ अभ्यास करतील आणि त्यातून मुलांची निवड केली जाईल. निवडलेल्या मुलांना नजीकच्या साई केंद्राद्वारे मोफत प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, सुविधा उपल्ध करून दिल्या जातील.’’ गुणवान आणि कौशल्यवान खेळाडूंचा शोध घेण्यास हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पोर्टलसाठी दिग्गजांसोबत बैठकच्आॅलिम्पिक स्पर्धा आटोपल्यानंतर देशभरातील विविध खेळांतील द्रोणाचार्य पुरस्कारविजेत्या मंडळींना एकत्र आणण्यात आले. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात असे घडले नव्हते. प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. च्पंतप्रधानांनी सर्वांची मते जाणून घेतली. दीर्घ चर्चेनंतर नरेंद्र मोदी यांनी पोर्टलची कल्पना मांडली. या कल्पनेचे प्रत्येकाने कौतुक केले आणि त्यातून आता पोर्टल सुरू होत आहे, असेही गोयल यांनी सांगितले.