शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

सात्विक आणि चिरागनं रचला इतिहास! 'जगज्जेत्या'ला नमवून इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 15:39 IST

Indonesia Open : भारताचे स्टार बॅटमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला आहे.

जकार्ता : भारताचे स्टार बॅटमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी इतिहास रचला आहे. जगज्जेत्याला नमवून इंडोनेशिया ओपनमध्ये विजय मिळवत भारतीय शिलेदारांनी तिरंग्याची शान वाढवली. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने रॉन चिया आणि सोह वुई यिक या मलेशियाच्या जोडीचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. 

विशेष बाब म्हणजे सात्विक आणि चिराग या जोडीचे हे पहिले सुपर १००० वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध सातवेळा पराभूत झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांना प्रथमच विजय मिळवण्यात यश आले. इंडोनेशिया ओपनच्या दुहेरीत भारताचे हे पहिले विजेतेपद आहे. खरं तर अ‍ॅरोन चिया आणि सोह वुई यिक ही जोडी पुरुष दुहेरीत जगज्जेते आहे.

भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिला गेम आपल्या नावावर केला. मलेशियाच्या जोडीने सामन्याची दमदार सुरुवात केली. कारण त्याच्याकडे ०-३ अशी मोठी आघाडी होती, त्यानंतर स्कोअर ३-७ असा झाला. पण त्यानंतर भारतीय जोडीने पुनरागमन करत ११-९ अशी आघाडी घेतली. यादरम्यान, सात्विक आणि चिरागने सलग ६ गुण मिळवले. यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार खेळ झाला. अखेर भारतीय जोडीने पहिला गेम १८ मिनिटांत २१-१७ अशा फरकाने जिंकला.

सात्विकसाईराज आणि चिराग जोडीचा भीमपराक्रमराष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन सात्विक आणि चिराग या जोडीला दुसऱ्या गेममध्ये देखील आव्हानांचा सामना करावा लागला. रॉन चिया आणि सोह वुई यिक यांचे मोठे आव्हान भारतीय शिलेदारांची डोकेदुखी वाढवत होते. एका टप्प्यावर सामना ५-५ असा बरोबरीत होता. मात्र, भारतीय जोडीने आघाडी घेण्यास सुरूवात केली आणि विजयाच्या दिशेने कूच केली. दुसऱ्या हाफच्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडीकडे ११-८ अशी आघाडी होती. यानंतर सात्विक आणि चिरागने आपला अप्रतिम खेळ सुरूच ठेवला. त्यांची आघाडी २०-१४ अशी झाली होती पण त्यांच्याकडून काही चुका देखील झाल्या. मलेशियाच्या जोडीने सलग चार गुण घेऊन रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भारतीय जोडीने २१-१८ अशा स्कोअरने गेमसह किताब देखील आपल्या नावावर केला.  

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाBadmintonBadmintonIndiaभारत